तोट्यातील उद्योग पुन्हा सुरु करण्याचे प्रयत्न, गितेंचं व्हिजन
एबीपी माझा वेब टीम | 11 May 2016 03:47 PM (IST)
नवी दिल्ली : तोट्यातील उद्योग पुन्हा सुरु करण्याचे प्रयत्न करु असं आश्वासन खासदार आणि अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी दिलं आहे. ते दिल्लीत 'माझा व्हिजन' कार्यक्रमात बोलत होते. 32 उद्योग खात्याच्या कक्षेत येतात, त्यापैकी 10 उद्योग बंद करण्याचा निर्णय कठीण कामगारविरोधी होता 60 हजार कोटींच्या इंधनाची बचत होते, तेव्हा प्रदूषणही कमी होतं. टू-व्हीलर, फोर-व्हीलर, बसेससाठी नवीन प्रस्ताव तयार होतात ऑटो सेक्टरला प्रमोट करण्याचा प्रयत्न करत आहे. या देशात असलेल्या ऑटो सेक्टरचा मालक अनंत गितेला भेटल्याशिवाय जात नाही मेक इंडिया ही एक घोषणा आहे, एक योजना आहे. तीन लाख कोटींपेक्षा जास्त रकमेचे करार गेल्या दोन महिन्यापुर्वी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात झालेत मेक इंडियासाठी असलेली सर्व मदत माझ्या खात्यातर्फे केली जातेय तोट्यातील कारखाने पुन्हा सुरु करण्याचे प्रयत्न राहतील मराठवाड्यात पेपर उद्योग आणण्याचे प्रयत्न आहेत