Majha Samvad LIVE UPDATES : माझा संवाद : सुजात आंबेडकर यांच्याशी बातचित, आंबेडकरांच्या नव्या पिढीचं व्हिजन
एक दोन नव्हे तर 14 वर्षे.... होय... महाराष्ट्राचं नंबर 1 न्यूज चॅनल ही ओळख एबीपी माझानं 14 वर्षे कायम ठेवली आहे. अचूक आणि जलद बातमी... प्रेक्षकांची विश्वासर्हता या त्रिसुत्रीची कास एबीपी माझानं कधी सोडली नाही आणि सोडणारही नाही. एबीपी माझावर आज दिवसभर वर्धापन दिनानिमित्त खास कार्यक्रमांचं प्रक्षेपण केलं जाणार आहे. महाराष्ट्रातल्या तरुणांचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांशी आम्ही दिवसभर मंथन करणार आहोत, माझा संवाद या विशेष मालिकेत.
टाटा कॅन्सर हॉस्पिटलसाठी म्हाडाने दिलेल्या शंभर खोल्यांच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती, टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना तात्पुरतं राहण्यासाठी म्हाडाने दिल्या होत्या 100 खोल्या, मात्र स्थानिक शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांची स्थगिती, त्या इमारतीमध्ये इतर रहिवाशांची तक्रार असल्याचं सांगत दिली स्थगिती, शरद पवार यांच्या उपस्थित हा कार्यकम पार पडला होता, कोणतीच चर्चा न करता मुख्यमंत्री यांनी स्थगिती दिल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
टाटा कॅन्सर हॉस्पिटलसाठी म्हाडाने दिलेल्या शंभर खोल्यांच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती, टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना तात्पुरतं राहण्यासाठी म्हाडाने दिल्या होत्या 100 खोल्या, मात्र स्थानिक शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांची स्थगिती, त्या इमारतीमध्ये इतर रहिवाशांची तक्रार असल्याचं सांगत दिली स्थगिती, शरद पवार यांच्या उपस्थित हा कार्यकम पार पडला होता, कोणतीच चर्चा न करता मुख्यमंत्री यांनी स्थगिती दिल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
शिर्डी साईबाबा संस्थान अध्यक्षपद राष्ट्रवादीला तर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर काँग्रेसच्या पारड्यात. आजच्या महाविकास आघाडी समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा, राष्ट्रवादीकडून शिर्डी संस्थान अध्यक्ष म्हणून आशुतोष काळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, तर विश्वस्त अजित कदम,पांडुरंग अभंग, संग्राम कोते,संदिप वर्पे, अनुराधाताई आदिक हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य म्हणून घोषणा होऊ शकते, शिर्डी साई संस्थान नियुक्ती संदर्भात न्यायालयात प्रकरण असल्याने लवकरच होणार अधिकृत घोषणा
आमदार प्रदीप जैस्वाल यांना न्या. आर. जी. अवचट यांच्या खंडपीठाने 15हजार रुपयांच्या जात मुचलक्यासह अटी, शर्थी सह जामीन मंजूर केला. शहरात मे 2018 मध्ये उसळलेल्या दंगलीनंतर अटक केलेल्या शिवसैनिकांना सोडून देण्याच्या मागणीसाठी क्रांती चौक पोलीस ठाण्यात मोडतोड करणे, पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी जैस्वाल यांना सत्र न्यायालयाने सहा महिन्यांची शिक्षा सुनावली होती.
सर्वांना केजी टू पीजी उत्तम दर्जाचं मोफत शिक्षण राज्य सरकारने दिलं पाहिजे, जेणेकरुन शिक्षण व्यवस्थेतीतील आरक्षणाचा मुद्दाही उपस्थित होणार नाही : सुजात आंबेडकर
महाराष्ट्रातलं राजकारण गोंधळलेलं आहे. महाविकास आघाडीचं काहीही व्हिजन दिसतं नाहीये : सुजात आंबेडकर
यापुढे निवडणुकीत सोशल मीडिया इतकं प्रभाव टाकणार नाही : सुजात आंबेडकर
माझा संवाद : सुजात आंबेडकर यांच्याशी बातचित, आंबेडकरांच्या नव्या पिढीचं व्हिजन
वरु सरदेसाई : शिवसेना शहरी पक्ष आहे असा टॅग लावला जातो. मात्र अनेक आमदार, खासदार ग्रामीण भागातून येतात, मागील ग्रामपंचायत निवडणुकीतही शिवसेनेला मोठं यश मिळालं. ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांची चांगला समन्वय साधला, तर शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही शिवसेनेला मोठं यश मिळेल.
यशोमती ठाकूर यांना राग खूप लवकर येतो, असं म्हणतात ते खरं आहे का? असं विचारल्यावर यशोमती ठाकूर म्हणाल्या की, "मला असं वाटत नाही. पण जिथे अन्याय होतो, तिथे मी सहन करु शकत नाही. कारण अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणाराही दोषी असतो. त्यामुळे जिथे अन्याय होतो तिथे मी रागावते."
"महिलांनी मोठ्या संख्येनं राजकारणात आल्या पाहिजेत. काँग्रेसच्या दोन महिला मंत्रिमंडळात आहेत. ही आमच्या पक्षाची व्यापकता आहे. तसेच यातूनच आमच्या वरिष्ठ नेत्यांचा दृष्टीकोन स्पष्ट होत आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी विचार करुन दोन्ही महिला सक्षम असल्यामुळे त्यांना मंत्रिपद देण्याचा निर्णय घेतला.", असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.
"सध्याची वेळ राजकारण करण्याची नाही. आपण सगळे एका महामारीला सामोरे जात आहोत. प्रत्येकानं कोणाला ना कोणाला गमावलं आहे. त्यामुळे ही वेळ राजकारण करण्याची नाहीच. आज एकच गोष्ट अपेक्षित आहे, आज मुख्यमंत्री आमचे कुटुंब प्रमुख आहेत. त्यामुळे ते जे निर्णय घेत आहेत, ते सक्षमतेनं घेत आहेत. राजधर्माला अनुसरुन त्यांच्याकडून पॉझिटिव्ह निर्णय होत आहेत. मी ट्वीट केलं, ट्वीट तर आपण सगळेच करतो. त्यामुळे राजकारण तोडायचं आणि पाडायचं अशी भाषा कोणीच करु नये. आम्ही तर करुच नये पण विरोधकांनीही असा प्रयत्न करु नये.", असं यशोमती ठाकूर बोलताना म्हणाल्या.
मी कोणत्याही चौकशीच्या ससेमीराला घाबरत नाही. मी कधीही फडणवीस किंवा मोदींविरोधात बोलत नाही. मी बोलतो ते त्यांच्या धोरणांविरोधात बोलत असतो : रोहित पवार
अंहकाराविरोधात तीन पक्षाचं सरकार एकत्र आलं. तीन पक्षांच्या सरकारने कोरोना काळाच सर्वात चांगलं काम केलं आहे. आता काँग्रेसच्या आमदारांची नाराजी किंवा काँग्रेसचा स्वबळाचा नारा हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. जेव्हा राज्याच्या हितासाठीचा प्रश्न येतो तेव्हा सर्व एकत्र येईन काम करत असतात. तसेच प्रताप सरनाईतांच्या लेटरमधील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजपच्या नेत्यांकडून विविध तपास यंत्रणांकडून सरकारी पक्षाच्या नेत्य़ावर होणारा दबाव. आता कुणाला त्यातून काय अर्थ काढायचा तो काढू शकतो, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे.
शिक्षणात मोठ्या प्रमाणता बदल करावे लागली. अंगणवाडीपासून ते थेट कॉलेजपर्यंत बदल कराव लागले. तसेच शिक्षण क्षेत्रात युवकांचा संवाद वाढवला पाहिजे. आरोग्य, कुपोषण, बरोजगार, आणि सुशिक्षित बेरोजगार यावर पुढील 15 वर्षात सर्वात जास्त काम करावं लागणार असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांनी मांडलं.
"राजकीय पक्ष हे वाढावे, त्या-त्या पक्षाच्या नेतृत्त्वाचा, देशाच्या लोकशाही प्रक्रियेतील हा अधिकार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या असतात, साधारणपणे 1999 पासून 2014 पर्यंत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होतं. त्या काळात या निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्या जायच्या. जिल्हा परिषद असो किंवा महापालिकेची निवडणूक असो. यामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांचं म्हणणं समजून घेतात, त्यांना विश्वासात घेतात, त्यानंतर मग निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यात येतो. त्यामुळे या निवडणुका स्वतंत्र लढवल्या जातात. त्यामुळे स्वबळाचा नारा देणं काही गैर नाही." असं विश्वजित कदम म्हणाले. काँग्रेसच्या तरुण नेतृत्त्वामध्ये स्वबळावर निवडणुका लढण्याचा स्वर आहे, असं म्हणता येईल का, असं विचारल्यावर ते म्हणाले की, "मी पुन्हा एकदा सांगतो मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलतोय. ज्यावेळी लोकसभा, विधानसभा निवडणुकांचा प्रश्न येतो, त्यावेळी हा निर्णय त्या-त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा असतो."
"गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्यांना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागत आहे. कोरोना योद्धे आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. अशा परिस्थिती नुकसान अनेक क्षेत्रांचं झालं. शेतीचं झालं, शेतकऱ्यांचं झालं, व्यापारी वर्गाचं झालं. गेल्या काही महिन्यांपासून हळूहळू अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. पण लॉकडाऊनमुळे अनेक लोक शेतीकडे आणखी व्यवस्थित लक्ष देऊ शकले. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊन काळात शेतीचं उत्पादन हे जवळपास साडेअकरा टक्क्यांनी वाढलं आहे. पण जर शेतीचा माल योग्य पद्धतीनं, चांगल्या किमतीत विकला गेला नाही, तर मग शेतीच्या उत्पादनात वाढ होऊनही फायदा होत नाही. यावरही राज्य सरकारच्या माध्यमातून बाजार समितींच्या माध्यमातून घरपोच सेवा सुरु ठेवली.", असं कृषी आणि सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी सांगितलं.
येणारी परिस्थिती पाहूनच शाळांबाबत निर्णय घेतला पाहिजे. शिक्षण नंतर पूर्ण करता येऊ शकतं, पण जीव पहिला महत्त्वाचा. सरकारचं पहिलं प्राधान्य आरोग्यावर आहे. त्यामुळे सगळ्या पालकांनी, विद्यार्थ्यांनी काळजी करु नये.
मंत्रीपद घेतलं म्हणजे सगळं बटण सारख व्यवस्थित होते असं नाही. काही गोष्टी या आंदोलनाच्या माध्यमातूनच झाल्या पाहिजे. आंदोलन किंवा चळवळी या जिवंतपणा आणण्यासाठी कराव्या लागतात. जर प्रशासनावर अंकुश आणि सामान्य माणसांना लोकाभिमूख प्रशासन हवं असेल तर ही वेशांतर करुन स्टिंग ऑपरेशन करण्याची गरज.
थोड्याच वेळात महाराष्ट्रातल्या तरुणांचं प्रतिनिधित्व करणाऱ्यां तरुण, तडफदार नेत्याशी मंथन करणार आहोत. माझा संवाद या विशेष मालिकेत
पार्श्वभूमी
मुंबई : एबीपी माझा वृत्तवाहिनीला आज 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. आम्ही आता 15व्या वर्षात पदार्पण करत आहोत. या 14व्या वर्षांच्या प्रवासात तुमची साथ आमच्यासाठी अमुल्य आहे. 14 वर्षांच्या प्रवासात ABP Network एबीपी नेटवर्कने देखील आपल्यात महत्वाचे बदल केले आहेत. या बदलांना प्रेक्षकांनीही साथ दिली. हा 14 वर्षांचा प्रवास सोपा नव्हता, पण तो केवळ प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच शक्य झाला.
एक दोन नव्हे तर 14 वर्षे.... होय... महाराष्ट्राचं नंबर 1 न्यूज चॅनल ही ओळख एबीपी माझानं 14 वर्षे कायम ठेवली आहे. अचूक आणि जलद बातमी... प्रेक्षकांची विश्वासर्हता या त्रिसुत्रीची कास एबीपी माझानं कधी सोडली नाही आणि सोडणारही नाही. एबीपी माझावर आज दिवसभर वर्धापन दिनानिमित्त खास कार्यक्रमांचं प्रक्षेपण केलं जाणार आहे. दरम्यान एबीपी माझाच्या 14 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना बोलतं केलंय संजय राऊत यांनी. 10 वाजता हा कट्टा पाहायला विसरु नका आणि माझा कट्ट्यानंतर महाराष्ट्रातल्या तरुणांचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांशी आम्ही दिवसभर मंथन करणार आहोत, माझा संवाद या विशेष मालिकेत.
'एबीपी माझा'च्या 14 वर्षांच्या प्रवासात आणखी एक आनंदाचा क्षण जोडला गेला आहे. 'एबीपी माझा'च्यावर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला सर्वात मोठा माझा इम्पॅक्ट दिसून आला आहे. एबीपी माझाच्या बातमीने 30 वर्ष अंधारात खितपत पडलेल्या बरडवस्ती प्रकाशमान झाली. आतापर्यंत अंधारात असलेलं औरंगाबादमधील बरड गाव 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर प्रकाशमान झालं. आहे. तब्बल 30 वर्ष हे गाव अंधारत होतं. गावात वीजच नव्हती. एबीपी माझाने गावच्या आधारलेल्या व्यथा मांडल्या आणि अवघ्या 10 दिवसांत गाव प्रकाशमान झालं. गावकऱ्यांच्या आनंदला पारावार उरला नाही. गावकऱ्यांनी आज आनंदाने गुढ्या उभ्या केल्या आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -