Aaditya Thackeray : माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन कार्यक्रमामध्ये आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे पक्षावर तसेच सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये पर्यावरण मंत्रिपद स्वीकारले होते. हा निर्णय चुकला का? अशी विचारणा त्यांना करण्यात आली. यावेळी त्यांनी भाष्य केले.


तुम्हाला 40 नेटफ्लिक्स एपिसोड करायला लागतील  


आदित्य ठाकरे म्हणाले की, फुटलं कोण आहे? आमच्यातून सामान्य शिवसैनिक नाही. सामान्य नागरिक उलट आमच्याजवळ आला. सामान्य शिवसैनिक आमच्या जवळ आला. पारंपारिक मतदार जो नव्हता त्यांनी उद्धवसाहेबांचं सरकार बघितलं, आमचं काम बघितलं, दोघांचं काम असेल, आमच्या सगळ्या पूर्ण सरकारचं काम बघितलं. मी असतो किंवा नसतो, त्यापेक्षा प्रत्येकाची मी स्टोरी सांगितल्यास तुम्हाला 40 नेटफ्लिक्स एपिसोड करायला लागतील आणि तुम्ही हसायला लागाल. 


ते पुढे म्हणाले की, मूळ गोष्ट अशी की ज्या व्यक्तींनी स्वतःला विकलं. उद्धवसाहेबांच्या दोन शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या काळात जे उद्धवसाहेबांच्या मागे असं काही करू शकतात? दरम्यान, हे सर्व तुमच्यासोबत होते मग आताच आरोप कशासाठी? अशी विचारणा केल्यानंतर ते म्हणाले की, आमच्या मंत्रिमंडळात अशी व्यक्ती होती की त्यांच्यावर घाणेरडे आरोप झाले. त्यांना आम्ही गेट आउट सांगितलं आणि मंत्रिमंडळातून बाहेर काढलं होतं. तेवढी हिम्मत दाखवत तुम्ही मंत्रीमंडळातून किंवा आमदारकीतून बाजूला करायला पाहिजे होतं. तुम्ही पुढील वेळी तिकीट नका देऊ. जर कोणी कारवाई करत असेल तर अडवू नका. आज काय झालं आहे कोणावर आरोप होतो तो तीन दिवसात ती व्यक्ती तिथे जाते. दुसऱ्या व्यक्तीवर आरोप होतो पाचव्या दिवशी ती व्यक्ती तिथे जाते. 


गद्दारांना आम्ही घेणार नाही,  असेही त्यांनी सांगितले. राजकारणात कोणी कोणाशी युती करायची, पक्ष न फोडता हा प्रत्येक पक्षाचा त्यांचा अधिकार असतो आता. 2007 मध्ये जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी प्रतिभाताईंना पाठिंबा तसेच प्रणवदांना आम्ही जाहीरपणे पाठिंबा दिला होता. 2012 ला माझे आजोबांना भेटून गेले होते. काँग्रेस काही देशाच्या विरोध पक्ष नाही. पीडीपी बरोबर सोबत भाजप बसले तेव्हा कोणी काही बोललं नाही. म्हणून मी सांगतोय की चौथा जो होतो तो एवढ्यासाठीच होतो. आमचे वायकर साहेब आहेत त्यांना हैराण केलं आहे. या आमच्या पक्षात, रिकन्सिडर करतो, असे म्हणत असल्याचे म्हणत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या