Majha Maharashtra Majha Vision : देश आस्थेवर नाही संविधानावर चालला पाहिजे, आरएसएसने हिंदुत्वाचा ठेका घेतलेला नाही, अशा शब्दात एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपला टोला लगावला. उद्याच्या महाराष्ट्रावर मंथन करण्यासाठी Majha Maharashtra Majha Vision मध्ये चर्चा करण्यात आली. यावेळी औवैसी यांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे.  


बी टीम असल्याचा आरोपाने मला फरक पडत नाही


ओवैसी म्हणाले की, भाजपची बी टीम असल्याचा आरोपाने मला फरक पडत नाही, आम्ही चांगलं काम करत आहोत. ते पुढे म्हणाले की, औरंगाबादमध्ये (छत्रपती संभाजीनगर) इम्तियाज जलील सेनेचा उमेदवार पाडून खासदार झाला, त्यामुळे या निवडणुकीत सुद्धा पुन्हा ते निवडून येतील. महाराष्ट्रातील राजकारणावर बोलताना ओवैसी म्हणाले की, आमची (मुस्लीम) मते हवीत, पण तिकिट द्यायला तयार नाहीत.


भाजप बी टीम असल्याचा आरोपावरही ओवैसी यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, बी टीम आरोपांचा मला फरक पडत नाही, आम्ही चांगलं काम करत आहोत. भाजपला हरवायचं म्हणजे फक्त आम्ही कुली व्हायचं का? अशी विचारणा त्यांनी केली. मोदी, भुजबळ म्हणतात मी ओबीसी म्हणतात, आम्ही काय वाजवत बसायचं का? अशीही विचारणा ओवैसी यांनी केली. ओवैसी यांनी मीरारोडवर झालेल्या प्रकाराचा उल्लेख केला. ते म्हणाले की, मीरारोडला झालेल्या प्रकारानंतर किती लोक गेले? कोणीही बाजू घेण्यास समोर आलं नाही. इम्तियाज जलीलना किती जणांनी फोन केले, त्यामुळे त्यांनीच मुंबईत निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याचे ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या