Devendra Fadnavis, Majha Maharashtra Majha Vision 2023: एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' कार्यक्रमात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला. ठाकरे सरकारच्या काळात मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट तत्कालीन सीपी संजय पांडे यांना दिलेलं, असं देवेंद्र फडणवीसांना सांगितलं. तसेच, तत्कालीन ठाकरे सरकार आणि महाविकास आघाडीवरही त्यांनी टीकास्त्र डागलं. तसेच, पॉलिटिकल सरप्राईजेस देणारे फडणवीस आता आणखी काय सरप्राईज देणार का? फडणवीसांचा 'प्लान ए' अजित पवार, 'प्लान बी' एकनाथ शिंदे, आता 'प्लान सी' अशोक चव्हाण असणार का? या प्रश्नांचं उत्तरही फडणवीसांनी दिलं.
फडणवीसांचा प्लान सी म्हणजे, अशोक चव्हाण? एबीपी माझाचा प्रश्न
देवेंद्र फडणवीस म्हणजे, गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राला सर्वाधिक राजकीय सरप्राईज देणारी व्यक्ती. आता हे सरप्राईजेस संपलेत का? कारण तुमचा 'प्लान ए' अजित पवार होता. 'प्लान बी' एकनाथ शिंदे होता. आता 'प्लान सी' C फॉर अशोक चव्हाण आहेत का?
आतातरी प्लान A, B, C... : देवेंद्र फडणवीस
या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 2024 पर्यंतचे सगळी सरप्राईजेस संपली आहेत. आता 2024 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी अनेक मोठे सरप्राईजेस तुम्हा सर्वांना निश्चितपणे देऊ. पण आतातरी प्लान A, B, C काहीच नाही. प्लान गव्हर्नन्स आहे. आम्हाला सध्या गव्हर्नन्सवर फोकस करायचाय. आम्हाला महाराष्ट्र जो मधल्या अडीच वर्षात थांबला होता. विकास होत नव्हता, तो महाराष्ट्र आम्हाला पुन्हा त्या ग्रोथ पाथवर आणायचाय. हेच आमचं ध्येय आहे."
तरुण, तडफदार, अभ्यासू आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला तेल लावलेला नवा पैलवान. अर्थात देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्र भाजपचं निर्विवाद नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस यांचा विरोधी पक्षात असलेला वचक आणि वजन वाखाणण्याजोगं आहे. 2019 ते 2022 या तीन वर्षांच्या काळात मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि उपमुख्यमंत्री अशी तीनही पदं त्यांच्या नावामागे लागली. एकनाथ शिंदेंचं बंड यशस्वी करण्यामागे असलेल्या शक्तीचा उगम फडणवीसांपासूनच सुरु होतो हे वादातीत सत्य आहे. महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा, नगर नियोजन, शेती, सहकार आणि क्रीडा या सगळ्या विषयांमधील बारकावे जाणून कामं वायुवेगानं कशी करुन घेता येतील यात त्यांची हातोटी आहे. मात्र त्याचवेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सरकारची इमेज स्वच्छ ठेवण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे. बेरोजगारी, महागाईचं संकट अधिक गहिरं होत असताना महाराष्ट्राला उद्योगांसाठी पूरक आणि आघाडीचं राज्य बनवण्यासाठी त्यांचं काय व्हिजन आहे? उद्धव ठाकरेंशी संबंध कायमचे नादुरुस्त राहणार का? अजित पवार आणि राष्ट्रवादीचा पर्याय कायमचा संपलाय का? अशा राजकीय प्रश्नांवर थेट बोलण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यावेळी यांनी आपलं व्हिजन स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :