मुंबई : पुस्तकी ज्ञान हे वाचून येत नाही. अनुभवाचं शहाणपण आणि पुस्तकी ज्ञानातला फरक काय असतो हे कळण्यासाठी दिठी या सिनेमातील पात्रांचा प्रवास म्हणजे पुस्तकी ज्ञान आणि अनुभवाचं शहाणपण दाखवणारा दिठी हा चित्रपट आहे, असं ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे म्हणाले. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्याशी माझा कट्टा या कार्यक्रमात मराठी रंगभूमी, सिनेमा अन् रंजक कथा यासह विविध विषयावर संवाद साधला.
आगाशे म्हणाले, थिंग ग्लोबली अॅक्ट लोकली श्रीकृष्णाने सांगितलेली मायावी रूप आपल्याला आत्ता कोरोनामुळे अनुभवायाला येत आहे.कोरोना संकट नाही संधी आहे. आयुष्य हे प्रवाही असते. आपले शिक्षण बुद्धीचे माध्यम आहे. शब्द हे माध्यम मौखिक असायचे. शब्द हे ज्ञानाचे कुटुंब आहे. प्रिटिंगमुळे वाचन घरात पोहचले. मौखिक परंपरेपासून लिखाणाच्या परंपरेपर्यंत येताना आई वडिल हरवले. सिनेमा आला तेव्हा या डिजीटल माध्यमांकडे जाणीवपूर्वक बघायला मिळाले पाहिजे आणि त्यांची किंमत कळावी म्हणून कोरोना आला. या पुढील काळात स्मृतीभ्रंशाच प्रमाण वाढेल.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आयुष्याची लांबी वाढत चालली आहे. मात्र त्याची खोली वाढते असे नक्की नाही. त्यामुळे आपला भूतकाळ वाढत गेला आणि भविष्यकाळ कमी होत गेला. भूतकाळाचं ओझं वाढत असून भविष्यकाळातील अनिश्चितता वाढत आहे. अॅक्सेप्टन्सनी आयुष्यात किती फरक पडतो हे यातून दिसते. औषध, जन्म, मरण हे बुद्धीचा विचार करुन घेण्याचे वैचारिक निर्णय झाले आहेत. ते भावनिक उरलेले नाहीत. किमान या काळामध्ये तरी सजगपणे आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे, असे डॉ. आगाशे म्हणाले.
ओरबाडून जगण्याला अर्थ नाही
डॉ. मोहन आगाशे म्हणाले, आपण जे जगतो ते जगण महत्त्वाचं आहे. जगण्यासाठी जे लागत ते करणे गरजेचे आहे त्याला उपजिवीका म्हणतात. आपल्याला ज्या गोष्टी हव्या असतात. समाधान, प्रेम, आनंद, दु:ख या मायावी जगाच्या मागे धावत होते. आता व्हर्च्युल जगामध्ये प्रत्येकाचं वेगळ जग आहे. कृत्रिमरित्या आयुष्य वाढणे आणि नैसर्गितरित्या वाढणे यामध्ये फरक आहे. पुनर्जन्माची संकल्पना ही तुम्हाला अधाशी होण्यापासून मागे नेते. ओरबाडून जगण्याला अर्थ नाही. हे कळण्यासाठी माध्यम हे प्रभावी साधन आहे.
अनावधनाने मी निर्मीती क्षेत्रात
वारीचं लहानपासून कुतुहुल होते.वारीत अतिशय वेगवेगळ्या कारणांनी त्यात सहभागी असणारे वारकरी असतात. दिठीवर चित्रपट करणे मला कधीच वाटले नाही. अस्तू नावाच्या सिनेमामुळे मी निर्मिती क्षेत्रात केला. अनावधनाने मी निर्मीती क्षेत्रात आलो. दिठी सिनेमाचा अनुभव चांगला होता, असे देखील आगाशे म्हणाले.