Majha Katta : जंगलातले पक्षी कधी आनंदात असतात, तर कधी दु:खात, कधी मनमोकळा संचार करतात तर कधी धोक्याची चाहूल देतात. पक्ष्यांमधलं हेच वेगळंपण ओळखणारे, माणसांपेक्षा प्राणी, पक्ष्यांमध्ये रमणारे ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे यांनी माझा कट्ट्यावर पक्ष्यांच्या संदर्भात त्यांचा स्वभाव कसा असतो. पक्षीनिरिक्षणाची त्यांनी सुरुवात कशी झाली या संदर्भात अनेक किस्से सांगितले.   


ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे हे गेली तीन दशकं पर्यावरण रक्षणाचं काम करतात. त्यांना 'किका' या नावाने ओळखतात. सर्वसामान्यांना निसर्गाच्या अधिक जवळ नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ते माणसांपेक्षा पक्ष्यांत जास्त रमणारे आहेत. इतकेच नव्हे तर आपल्या पुढील पिढीला पक्षीनिरिक्षणाची आवड व्हावी, निसर्गाबरोबरच पक्ष्यांचंही संवर्धन करावं यासाठी त्यांनी आजवर अनेक उपक्रम राबविले आहेत. 


पक्षीनिरिक्षणाची सुरुवात नेमकी कशी झाली? 


पक्षीनिरिक्षणाच्या आठवणीबद्दल सांगताना किरण पुरंदरे म्हणाले, 1972 साली एरंडवणे गावठाण या ठिकाणी आम्ही जेव्हा राहत होतो. तेव्हा एका पक्ष्याचा आवाज ऐकू यायचा. त्या ठिकाणी 'चित्तुर' नावाचा पक्षी ज्या पद्धतीने आवाज काढायचा ते पाहून मी अचंबित झालो. कारण हा आवाज लांबून ऐकल्यानंतर कोणाला तरी हाक मारल्यासारखा वाटतो. त्या आवाजाच्या मी बरेच दिवस शोधात होतो. आणि बराच प्रयत्न केल्यानंतर मला तो आवाज काढता आला.


नागझिरा जंगलातले ते 450 दिवस 


नागझिऱ्याच्या जंगलातील आठवणींबद्दल सांगताना किरण पुरदंरे म्हणाले, 'व्यंकटेश माडगूळकर हे माझं दैवत आहेत. त्यांच्याकडे मी माझी जंगलात राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी नागझिरा हे नाव सुचवलं. 152 चौ. मी चं हे जंगल  होतं आणि त्या जंगलात साडेचारशे दिवस एकटा राहिलो होतो. त्या दिवसांत वीज नाही, पाणी नाही, वर्तमानपत्र, संगणक, ऐकण्याचं कोणतंही साधन नाही. संवादाचं साधन नाही. अशा वातावरणात राहताा पक्ष्यांबद्दलची ओढ आणखी वाढत गेली. असे ते म्हणाले.   


जेव्हा वाघ समोर येतो...


वाघाच्या संदर्भात सांगताना किरण पुरंदरे म्हणाले, वाघाला बघितल्यानंतर जंगलात एक सलामी झडते. अनेक छोटे छोटे प्राणी जे वाघाला घाबरतात ते वेगवेगळ्या पद्धतीने आवाज करायला लागतात. तसेच, वाघ जंगलात जसा संचार करतो तस तसा तो त्याच्या पाऊलखुणा मागे सोडत असतो. त्यामुळे हे दृश्य बघण्यासारखं असतं. 


स्थलांतरित पक्षी जेव्हा भारतात येतात तेव्हा...


पक्ष्यांच्या विविध आवाजावरून, स्वभावरून सांगितल्यानंतर स्थलांतरित पक्ष्यांबद्दल ते म्हणाले की, जेव्हा स्थलांतरित पक्षी तीन-चार महिन्यांच्या काळासाठी येतात तेव्हा त्यांच्यात आणि स्थानिक पक्ष्यांत नातं फार वेगळं असतं. त्यांच्यात फक्त अन्नासाठी स्पर्धा असते. तसेच, स्थलांतरित पक्षी जरी एका झुंडीने विहार करताना दिसले तरी ते हळूहळू विखुरतात. आणि जेव्हा त्यांना परतीची वेळ कळते तेव्हा त्यांच्यात शरीरांतर्गत बदल घडतात. शरीरात विशिष्ट प्रकारच्या हार्मोन्सची निर्मिती होते. ते अस्वस्थ होतात. एकत्र येतात. छोट्या परिसरात पसरतात. जुनी पिसं गळतात. आणि विहार करण्यासाठी त्यांच्या शरीरावर नवीन पिसं यायला सुरुवात होते.  


महत्त्वाच्या बातम्या : 


Sargam Koushal Exclusive : मिसेस वर्ल्ड सरगम कौशलचं मायदेशी धुमधडाक्यात स्वागत; भारतात परतल्यानंतर एबीपी न्यूजशी साधला संवाद