महाराष्ट्राच्या घराघरात आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून रामाची महती, राम नामाचा अर्थ आणि रामायणाची शिकवण पोहाचवणाऱ्याचं काम ह.भ.प जलाल महाराज हे गेली अनेक वर्ष करतायत. राम नामाची महती ही सगळ्यांनाच ऐकायला आवडते. पण जेव्हा सय्यद महाराज ती महती सांगतात तेव्हा ती सगळ्यांनांच ऐकायला आवडते. यावर 'माझा कट्टा'वर (Majha Katta) बोलताना सय्यद महाराजांनी म्हटलं की, रामायण आणि श्रीराम कोणत्या जातीविषयाचे नाही, हे मानणारे आम्ही आहोत. माझे वडिल एकतारा भजन करायचे, माझे आजोबा महोम्मद बाबा वारकरी भजन करायचे, माझे नातेवाईकही भजन करायचे.


असं म्हटलं जातं की, माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवलं जात नाही. त्यामुळे मी किर्तनकार होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अनेक गोष्टींचा अभ्यास केला. अनेक प्रकारच्या रामायणाचा मी अभ्यास केला. राम मंदिराच्या सोहळ्याचा देखील मला खूप आनंद झाला, असंही जलाल महाराजांनी म्हटलं.  मी निफाड तालुक्यातलं माझं गाव आहे. पण माझ्या गावात जितका आमचा समाज आहे, तो सगळा वारकरी संप्रदायाशी संलग्न आहे. आम्ही एकमेकांना भेटून रामकृष्ण हरि असंच अभिवादन करतो. आजही मुस्लिम किर्तनकार अनेक आहेत. वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक जातीचा संत मोठा करण्यामागे ज्ञानेश्वर माऊलींचा खूप मोठा हात आहे. वारकरी संप्रदायाचा विचार हा व्यापक आहे, असं म्हणत जलाल महाराज सय्यद यांनी त्यांच्या भावना माझा कट्ट्यावर व्यक्त केला. 


माझ्यामध्ये राम बिंबवला - जलाल महाराज सय्यद 


माझ्या पूर्वजांनी, माझ्या वडिलांनी, आजोबांनी, गुरुजनांनी माझ्यामध्ये राम बिंबवला. जेव्हा मी म्हणतो त्याआधी मुखी राम असं येतं. त्यामुळे राम हा आमचा आहे. अयोध्येत श्रीराम हे बालस्वरुपात आले, हा क्षण माझ्यासाठी परमोच्च आनंदाचा क्षण होता, असंही जलाल महाराजांनी यावेळी माझा कट्ट्यावर म्हटलं. 


मंथर ही व्यक्ती रामायणात नसावी - जलाल महाराज सय्यद 


मंथरा ही व्यक्ती रामायणात नसावी. मंथरा ही वृत्ती आहे. मंथर म्हणजे मनाचा विस्थर जो मेंदूशी जोडला गेलाय. रामावर सगळ्यात जास्त प्रेम करणारी माता ही कैकयी होती. कैकयीचं तसंच झालं. राम हा तिचा सगळ्यात प्रिय पुत्र होता. असं जरी असलं तरीही मनात काहीतरी विस्थर होतं, म्हणून कैकयीने रामाला दंडकारण्यात वनवासात पाठवलं, असे अनेक किस्से जलाल महाराज सय्यद यांनी माझा कट्ट्यावर उलगडले.



ही बातमी वाचा : 


Vinod Tawde : तेजस्वीला मुख्यमंत्री नको म्हणूनच राजदला सत्तेतून हटवलं; विनोद तावडेंचा सत्ताबदलाचा गौप्यस्फोट