मुंबई : महाराष्ट्र भाजपमधून पंकजा मुंडे (Pankaja Munde) बाहेर पडल्या आहेत का यावर देखील भाजप नेत्या पंकजा मुडेंनी स्पष्टीकरण 'माझा कट्ट्या'वर (Majha Katta) दिलं आहे. यावर बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटलं की, 'जेव्हा मी महाराष्ट्राच्या कोअर कमिटीमध्ये होते तेव्हा देखील आम्ही स्वत:हून काही करु शकत नव्हतो. ' तर सध्या महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीमध्ये माझी फारशी महत्त्वाची भूमिका नसल्याचं यावेळी पंकजा मुंडे म्हटलं आहे.  मी सध्या राष्ट्रीय राजकारणात असल्यामुळे मी यामधून बाहेर असल्याचं यावेळी पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे. 


भाजपच्या राजकिय प्रवासमधील दोन महत्त्वाची नावे म्हणजे मुंडे आणि महाजन. याच मुंडे आणि महाजन घराण्याचा राजकीय घरण्याचा वारसा पुढे नेणाऱ्या पंकजा मुंडे यांना भाजपमधून साईडलाईन केलं जात आहे का, हा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. याच बाबतीत त्यांचं मत काय आहे याविषयी त्यांनी माझा कट्टावर उलगडा केला आहे. महाराष्ट्र भाजपमधून एकही महत्त्वाचं पद नसणं, विधानसभेतील पराभवनानंतर त्यांचे राजकीय पुनर्वसन होणं, अचानक त्यांनी राजकारणातून ब्रेक घेणं त्यानंतर काढलेल्या शिवशक्ती परिक्रमेनंतर त्यांच्या साखर कारखान्यावर कारवाई होणं यामुळे त्यांची राजकीय कोंडी केली जात असल्याचं त्यांच्या समर्थकांना पडला आहे. मागील काही महिन्यांपासून त्यांची राजकीय अस्वस्थता काही लपून राहिली नाही. त्याचीच उत्तप पंकजा मुंडे यांनी माझा कट्ट्यावर दिली. 


मध्यप्रदेशाच्या रणधुमाळीत पंकजा मुंडे कुठे?


'मध्यप्रदेशच्या सहप्रभारी म्हणून निवड करण्यात आली आहे. पण यामध्ये पंकजा मुंडे कुठेही दिसत नाही. यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी प्रत्येक ठिकाणी जाणं गरजेचं नाही. जो पर्यंत आमचा मोदी @9 हा कार्यक्रम होता, तोपर्यंत मी मध्यप्रदेशातच होते. मी मग त्यसााठी माझ्या गावावरुन 18 तासांचा प्रवास करुन मध्यप्रदेशातील बालाघाट येथील कार्यक्रमांना देखील उपस्थित राहिले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानामध्ये पक्ष जसे आदेश देईल तसं मी काम करेन', असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.  


'तुम्ही आपणहून काही करु शकत नाही'


'तुम्ही पक्षात काम करत असताना कोणताही निर्णय स्वत:हून निर्णय घेऊ शकत नाही. जे तुम्हाला पक्ष सांगेल तसं करावं लागतं. एक यंत्रणा असते ती काम करत असते. त्या यंत्रणेमध्ये राहून तुम्हाला काम करावं लागतं. त्यामुळे मी त्या यंत्रणेमध्ये राहून काम करत आहे', असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. 


हेही वाचा : 


Supriya Sule : भारतीय जनता पार्टी म्हणते 'बेटी बचाव, बेटी पढाव', मात्र मुंडे भगिनींची काय अवस्था करून ठेवलीय, सुप्रिया सुळेंचा सवाल