नाशिक :  मैत्रेय कंपनीत गुंतवलेले पैसे उद्या म्हणजेच शुक्रवारपासून परत मिळणार आहेत. गुंतवणूकदारांना त्यांच्या थकीत पैशाचे डीडी उद्या दुपारी 4 वाजता नाशिकच्या रावसाहेब थोरात सभागृहात वाटप करण्यात येईल.


 

ठेवीची मुदत संपलेल्या 125 तक्रारदारांना पोलीस आयुक्त एस.जगन्नाथ यांच्या हस्ते डिमांड ड्राफ देण्यात येणार आहे.

 

तर उर्वरीत ठेवीदारांना स्थापन केलेल्या समितीच्या सुचनेनुसार पैसे मिळणार असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सिताराम कोल्हे यांनी दिली.

 

दरम्यान मैत्रेयच्या ठेवीदारांसंदर्भात पैसे परत मिळण्याची बातमी प्रसारीत होताच, नाशिक पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. काल एकाच दिवसात तब्बल अकराशे तक्रारी सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाल्या. मैत्रेय चित्रफंडनं देशातल्या एकूण 20 लाख गुंतवणूकदारांना चुना लावला आहे.

संबंधित बातम्या


'मैत्रेय'मध्ये गुंतवलेले पैसे परत मिळणार, देशातील ऐतिहासिक घटना