बीड : सुमित वाघमारे हत्या प्रकरणात पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. सुमितचा खून करून फरार झालेल्या बालाजी लांडगे आणि संकेत वाघ या दोघांना पोलिसांनी अकोला परिसरातून अटक केली.

अखेर पाच दिवसांनतर फरार झालेल्या बालाजी लांडगे आणि संकेत वाघ या दोघांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. या दोन आरोपीसह अन्य आरोपीना पोलिसांनी अकोला परिसरातून अटक केली आहे.

पाच दिवसापासून पोलीस आरोपींच्या मागावर होते. आरोपीचे मोबाईल लोकेशन, नातेवाईक, मित्र यांची कसून चौकशी करण्यात येत आली. अखेर पाच दिवसांनी पोलिसांना आरोपी अकोला भागात असल्याची खबर मिळाली. पोलिसांनी लगेचच बालाजी लांडगे,संकेत वाघ आणि बीड शहरातून गजानन क्षीरसागर यांना अटक केली.

यापूर्वीही पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. मुख्य आरोपी बालाजी लांडगेला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी कृष्णा क्षीरसागर या आरोपीस अटक केली आहे.

काय आहे हे प्रकरण?

प्रेमविवाह केल्याने बायकोच्या भावानेच सुमितची धारदार शस्त्राने हत्या केली होती. सुमितने दोन महिन्यापूर्वी वर्गमैत्रिण भाग्यश्रीसोबत प्रेम विवाह केला होता. बीड शहरातील मावशीकडे शिक्षणासाठी सुमित राहत असलेल्या सुमितचं महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या भाग्यश्रीसोबत प्रेम जुळले होते. दोघांच्याही कुटुंबियांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. मात्र घरच्यांच्या विरोध झुगारून भाग्यश्री आणि सुमितने लग्न केलं.

मात्र दोघांनी सुमित-भाग्यश्रीने लग्न केल्याचा राग मनात ठेवून भाग्यश्रीचा भाऊ बालाजी लांडगेने त्याची हत्या केली. तर भाग्यश्री या हल्ल्यात जखमी झाली आहे. सुमितवर हल्ला करणारे आरोपी घटनेनंतर फरार होते अखेर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.

संबंधित बातम्या


प्रेमविवाह केल्याने बायकोच्या भावाकडून तरुणाची हत्या


सुमित वाघमारे हत्या प्रकरणी एकाला अटक