जालना : पद्मभूषण, स्वातंत्र्य सैनिक आणि महिको कंपनीचे संस्थापक अध्यक्ष बद्रीनारायण बारवाले यांचं मुंबई येथे 4.30 वाजता निधन झालं. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


हैद्राबाद मुक्तीसंग्रामात बद्रीनारायण बारवाले यांचं महत्वाचं योगदान आहे. तर मराठवाडा स्वातंत्र्यासाठी त्यांनी एका वर्षाचा कारावासही भोगला होता. त्यांना 2001 साली वाणिज्य, आर्थिक क्षेत्रातील सर्वोच्च पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

बद्रीनारायण बारवाले महिको कंपनीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. संकरीत बियाणे उत्पादन आणि संशोधनात त्याचं महत्वाचं योगदान आहे. त्यांच्यावर मुंबईतील चंदनवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.