ताम्हिणी घाटाची ओघळ पार करताना दोन ट्रेकर्स वाहून गेले
एबीपी माझा वेब टीम | 24 Jul 2017 05:17 PM (IST)
रायगड जिल्ह्यातल्या भीरा धरणक्षेत्रातील पाण्याच्या प्रवाहात दोन ट्रेकर्स वाहून गेले आहेत. शनिवारी ताम्हिणी घाटाची ओघळ पार करताना हा अपघात घडला आहे.
रायगड : रायगड जिल्ह्यातल्या भीरा धरणक्षेत्रातील पाण्याच्या प्रवाहात दोन ट्रेकर्स वाहून गेले आहेत. शनिवारी ताम्हिणी घाटाची ओघळ पार करताना हा अपघात घडला आहे. शनिवारी ताम्हिणी घाटात 3 मित्र पुण्याहून ट्रेकिंगसाठी आले होते. ताम्हिणी घाटाची ओघळ पार करताना राहुल उमाटे आणि सागर दुधे या दोघा ट्रेकर्सचा पाय घसरला आणि ते प्रवाहासोबत वाहून गेले. राहुल उमाटे हा नागपूरचा रहिवासी आहे, तर सागर हा सांगवीचा राहणारा आहे. हे सगळे ट्रेकर्स खराडीच्या आयटी पार्कमधील टेलिकॉम कंपनीत काम करत होते. सध्या एनडीआरएफच्या टीमतर्फे या दोघांचा शोध सुरु आहे. ताम्हिणीतून जाणारी ही ओघळ थेट भीरा धरणाला मिळत असल्यानं त्यांचा शोध आता धरण परिसरात सुरु आहे.