मुंबई : दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यगौरवाच्या प्रस्तावावरून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. मात्र खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत विरोधकांमधल्या वादावर तोडगा शोधून काढला.


विधान भवनात मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यात बैठक पार पडली.

5 ऑगस्टला शरद पवार आणि गणपतराव देशमुख तर 9 ऑगस्टला इंदिरा गांधी यांच्या कार्यगौरवाचा स्वतंत्र प्रस्ताव मांडण्याचं बैठकीत ठरवण्यात आलं. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील वादावर अखेर पडदा पडला.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे.