Maharashtra Unseasonal Rain Update : सध्या हिवाळा सुरु आहे, अशातच आता पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 6 ते 9 जानेवारी दरम्यान राज्यातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे, तर काही भागांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
उत्तरेकडील वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम म्हणून राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. दिनांक 6 ते 9 जानेवारी दरम्यान दाट पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, 6 जानेवारीला धुळे आणि नंदुरबार येथे दाट पावासाची शक्यता आहे. तर 7 जानेवारीला धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांत पावासाची शक्यता आहे. तर 8 जानेवारी रोजी ठाणे, पालघर जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर 9 जानेवारीला मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात येणाऱ्या अवकाळी पावसाचे कारण उत्तरेकडील वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम असून राज्यात काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी दाट पावासाची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. अशातच अवकाळी पावसामुळं बळीराज्याच्या चिंतेत भर पडली असून यापूर्वी झालेल्या अवकाळीनं रबी पिकांना मोठा फटका बसला होता. अशातच आता पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजावर आस्मानी संकट कोसळणार आहे.
हे ही वाचा -
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha