सोलापूर :सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Guardian Minister Jayakumar Gore) यांच्या विरोधात महिला काँग्रेस (Mahila Congress) आक्रमक झाली आहे. सोलापूरमध्ये (Solapur) काँग्रेस भवनच्या बाहेर पालकमंत्री गोरेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. त्याचबरोबर साडी चोळीचा आहेर देखील देण्यात आला. गोरे हे काळे कारनामे करत असून त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी सोलापूर काँग्रेस महिला आघाडीनं केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Guardian Minister Jayakumar Gore) यांच्यावर एका महिलेसंदर्भात आरोप झाले आहेत. एका महिलेला गोरे यांनी विविस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र कोर्टाचा दाखला देत जयकुमार गोरेंनी सर्व आरोप फेटाळून लावले असून बदनामी करणाऱ्या विरोधकांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिला आहे. या सर्व घडामोडी घडत असताना पीडित महिला समोर आली असून तिने राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे गोरेंची तक्रार करणार असल्याचे म्हटलं आहे. तसेच गोरेंच्या विरोधात येत्या 17 तारखेला उपोषणाला बसणार असल्याचे पीडित महिलेने सांगितले आहे. 2015-16 चं हे प्रकरण असून जयकुमार गोरे यांनी मला प्रचंड मानसिक त्रास दिला होता. वेगवेगळ्या नंबरवरून वेगवेगळे फोटो पाठवले होते. फक्त फोटोच नाही तर अश्लील शिव्या देखील त्यांनी माझ्यासह माझ्या आईला दिल्या होत्या, असं वक्तव्य पीडित महिलेने केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक
दरम्यान, दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. जोशी यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून आज सोलापुरात आंदोलन करण्यात आलं. भैय्याजी जोशी यांच्या विरोधात सोलापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. शहरातील चार पुतळा चौकात ठाकरे गटानं भैय्याजी जोशी यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. भैय्याजी जोशी हे मुंबईतून मराठी भाषा हद्दपार करण्यासाठी कुटील डाव आखत असल्याचा ठाकरेंच्या सेनेचा आरोप आहे. हाताला काळ्या फिती बांधत यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान, याच वेळी प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
महत्वाच्या बातम्या: