पुणे: समृद्ध जीवनचे संस्थापक महेश मोतेवारची पत्नी लीना मोतेवारचे चार किलो सोने चोरीला गेल्याची घटना उघड झाले आहे. या प्रकरणी लीना मोतेवारने ड्रायव्हरवर संशय व्यक्त केला होता. पण गुन्हे शाखेच्या युनिट चारने दोन दिवसांपूर्वी अटक केलेल्या आरोपींनी दिलेल्या कबुलीने हे बिंग फुटलं आहे.
वाल्हेकर वाडीत राहणारा ड्रायव्हर नरहरी घरतच्या घरी दोन स्वतंत्र डब्यात प्रत्येकी 4 किलो असे एकूण आठ किलो सोने ठेवले होते. त्यापैकी एक डबा 29 जानेवारी 2016 ला चोरीला गेला होता. मात्र, याची तक्रार दाखल न करता लीना मोतेवार यांनी चालकालाच करमळ्याला पाठविले.
या प्रकरणात सुरुवातीला मोतेवारच्या पत्नीने चालकावर दागिने चोरल्याचा आरोप केला. मात्र, चालकाने सत्यस्थिती सांगताच, तक्रार करू नये म्हणून त्यास गावाला पाठविले.
दरम्यान, या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्याच आले असून या दोघांनी गुन्हा कबूल केला आहे. या घटनेची चिंचवड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून गुन्हा दाखल झाला आहे.