मुंबई : सध्या जागा वाटपावरून जोरदार चर्चा महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) सुरू आहे. प्रमुख पक्ष्यांची चर्चा सुरू असताना घटक पक्ष देखील विधानसभेसाठी जोरदार तयारी करतायत . महायुतीत देखील घटक पक्ष विधानसभेसाठी सज्ज आहेत. मात्र महायुतीत आपल्याला जागा मिळतात की नाही यावरून हवालदीत असल्याचा पाहायला मिळतात. घटक पक्षांची माहिती मगणी काय ? छोट्या पक्षांचे विधानसभेसाठी काय गणित आहे? 


आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती महाविकास आघाडी व इतर राजकीय पक्षांमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहेत. यामध्ये सर्वच आगामी विधानसभेसाठी जागा वाटपाची चर्चा करत असताना राज्यातील महत्त्वाचे छोटे पक्ष देखील महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. हे सर्वात छोटे पक्ष सध्या विधानसभेसाठी जोरदार तयारी करत आहेत. त्यांनी  महायुतीतील महत्त्वाच्या पक्षांकडे काही जागांसाठी मागण्या देखील केल्या आहेत.


महायुतीतील घटक पक्षांची मागणी काय?



  • महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने 40 जागांची मागणी केली. 

  • पीपल्स रिपब्लिकन पक्ष कवाडे गटाने 15 जागांची मागणी केली आहे. 

  • आरपीआय आठवले गटाने महायुतीत बारा जागांची मागणी केली. 

  • जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे आगामी विधानसभेसाठी 12 ते 15 जागा मागितल्यात. 

  • जनप्रहार पक्षाने तर मागणी करत करत युती तोडली.

  • इतर सहकारी पक्षाने देखील दोन-चार जागांच्या मागण्या केल्या आहेत


मागील लोकसभा निवडणुकीमध्ये या सर्व घटक पक्षांनी आपण जागा न लढवता महायुतीचा इमाने इतबारे प्रचार केला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी छोट्या पक्षांची जागा लढण्याची इच्छा असताना देखील युतीत सामंजस्याची भूमिका युतीत घेत, महायुतीतील मोठ्या पक्षांनी विधानसभेसाठी आश्वासन दिल त्यामुळे छोट्या पक्षांनी माघार घेतली. त्यामुळे यावेळी तरी सन्मान जनक जागा मिळाव्यात अशी मागणी आता महायुतीतील घटक मित्र पक्षांनी केली. 


छोटे पक्ष हवालदिल


 महायुतीमध्ये सरकार स्थापन झाल्यापासून छोट्या मित्र पक्षांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता गेल्या अडीच वर्ष काम केले. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी महायुतीतील मोठ्या पक्षांमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू असताना छोट्या पक्षांच्या मागण्यांवर देखील विचार करा. घटक पक्षांची बैठक लवकर बोलवा अशी मागणी आता महायुतीतील छोटे पक्ष करताना पाहायला मिळतात. यावेळी तरी जागा मिळतात की नाही त्यामुळे छोटे पक्ष हवालदिल झाले आहेत. 


महायुतीतल्या छोट्या पक्षांचे म्हणणे काय? 



  • युतीत आमच्या जागांवर विचार केला जावा 

  • छोट्या घटक पक्षांची मोठ्या पक्षांसोबत बैठक लावावी

  • लोकसभेत जागा दिल्या नाही पण विधानसभेत द्या 

  • विधान परिषदेसाठी देखील छोट्या पक्षांच्या नेत्यांचा विचार करावा 


लोकसभेवेळी घटक पक्षांना जागा दिल्या नाही त्यामुळे विधानसभेला तरी द्या महायुतीतील घटक पक्षांची भूमिका आहे. सन्मानजनक जागा विधानसभेसाठी मिळाल्या नाहीत तर आता छोटे पक्ष वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. 


हे ही वाचा :


शरद पवारांनी फक्त 30 दिवसात सहकार पंढरीतील भाजपचे दोन मोहरे गळाला लावले! तिसरा दणका सोलापुरात?