Mahayuti Lok Sabha Election Seat Sharing : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये (Mahayuti) सुरु असलेला जागावाटपाचा तिढा काही सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रकिया सुरु झाली असतानाही जागावाटपाचा अंतिम निर्णय होत नसल्याचे चित्र आहे. महायुतीमध्ये एकूण 4 जागांवरून तिन्ही पक्षात संघर्ष पाहायला मिळत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वर्षा बंगल्यावर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर आणि अजित पवारांच्या (Ajit Pawar) देवगिरी निवासस्थानी बैठकांवर बैठका सुरु आहे. तर, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar), धाराशिव (Dharashiv), नाशिक (Nashik) आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri–Sindhudurg Lok Sabha Constituency) या चार मतदारसंघामुळे महायुतीमधील जागावाटपाचा (Mahayuti Seat Sharing)  तिढा कायम आहे. 


संभाजीनगरवर भाजप-शिंदेसेनेचा दावा... (Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Constituency)


छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमधी जागावाटपाचा तिढा पाहायला मिळत आहे. भाजपकडून या जागेवर दावा केला जात आहे. तर, दुसरीकडे शिंदेसेना देखील हा मतदारसंघ सोडण्यासाठी तयार नसल्याचे चित्र आहे. शिंदे गटाकडून मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. तर, भाजपकडून भागवत कराड इच्छुक आहेत. 


धाराशिव मतदारसंघावर तिन्ही पक्षाचा दावा... (Dharashiv Lok Sabha Constituency)


धाराशिव लोकसभा मतदारसंघावर महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकाचवेळी दावा केला आहे. शिंदेसेना आणि राष्ट्रवादीत या मतदारसंघासाठी अधिक रस्सीखेच पाहायला मिळत आहे. तर भाजपने देखील दावा केला आहे. भाजपकडून सेवानिवृत्त आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्या नावाची चर्चा आहे. तर, घड्याळ चिन्हावर परदेशी यांनी रिंगणात उतरवावे असे राष्ट्रवादी गटात चर्चा आहे. 


नाशिक सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ... (Nashik Lok Sabha Constituency)


महायुतीमध्ये जागावाटपात सर्वाधिक अडचणीचा ठरणारा मतदारसंघ म्हणून नाशिककडे पाहिले जात आहे. शिंदे सेना आणि राष्ट्रवादीत या मतदारसंघावर संघर्ष पाहायला मिळत आहे. शिंदे गटाकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना कामाला लागा अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. तर, आपल्या नावाची चर्चा थेट दिल्लीत झाल्याचा दावा राष्ट्रवादीचे छगन भुजबळ करत आहेत. अशात भाजपकडून देखील उमेदवाराची चाचपणी सुरूच असल्याची चर्चा आहे. 


रत्नागिरी - सिंधुदुर्गसाठी उदय सामंत आग्रही...देण्याच्या हालचाली सुरु आहेत. (Ratnagiri–Sindhudurg Lok Sabha Constituency)


रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून शिंदेसेना आणि भाजपात एकमत होत नसल्याचे चित्र आहे. ही जागा शिवसेनेला मिळावी यासाठी उदय सामंत आग्रही आहेत. कारण, उदय सामंत यांचा भाऊ किरण सामंत या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र,  भाजपकडून नारायण राणे यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरु आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Ramdas Athawale: देवेंद्र फडणवीस मला शिर्डीतून उमेदवारी द्यायला तयार होते, पण एकनाथ शिंदेंना अडचण; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट