मुंबई : शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या महाविकास आघाडीच्या 162 आमदारांच्या सह्यांचं पत्र एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. शिवसेनेच्या सर्व 56, काँग्रेसच्या सर्व 44 आणि राष्ट्रवादीच्या 51 पैकी 50 आमदारांच्या सह्या या पत्रात आहेत. तर आमदार नरहरी झिरवळ यांची स्वाक्षरी नसली तरी त्यांचं पाठिंब्याचं पत्र जोडलं आहे. शिवाय दहा अपक्ष आणि अन्य आमदारांच्या सह्यांचा यात समावेश आहे.

राज्यातील राजकारणासाठी कालचा दिवस ऐतिहासिक दिवस ठरला. पूर्वाश्रमीचे विरोधक असलेले तिनही पक्ष ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये एकत्र आले. 'ऑपरेशन लोटस' आणि 'ऑपरेशन शिवतेज'ची चर्चा असताना महाविकासआघाडीने 'आम्ही 162' च्या माध्यमातून आपली एकजूट दाखवून दिली. महाविकासआघाडीकडे 162चं संख्याबळ असल्याचं चित्र माध्यमांमधून संपूर्ण महाराष्ट्राला दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कोणत्या आमदारांच्या सह्या या पत्रात आहेत, त्यावर एक नजर.



शिवसेना आमदार
आदित्य ठाकरे - वरळी
लताबाई सोनावणे - चोपडा
गुलाबराव पाटील - जळगाव ग्रामीण
चिमणराव पाटील - एरंडोल
किशोर पाटील - पाचोरा
संजय गायकवाड - बुलडाणा
संजय रायमुलकर - मेहकर
नितीन देशमुख - बाळापूर
संजय राठोड - दिग्रस
बालाजी कल्याणकर -नांदेड उत्तर
संतोष बांगर - कळमनुरी
डॉ. राहुल पाटील - परभणी
अब्दुल सत्तार - सिल्लोड
उदयसिंह राजपूत - कन्नड
प्रदीप जयस्वाल -औरंगाबाद मध्य
संजय शिरसाट - औरंगाबाद पश्चिम
रमेश बोरनारे - वैजापूर
संदीपान भुमरे - पैठण
सुहास कांदे - नांदगाव
दादा भुसे - मालेगाव बाह्य
श्रीनिवास वनगा - पालघर
शांताराम मोरे - भिवंडी ग्रामीण
विश्वनाथ भोईर -कल्याण पश्चिम
डॉ. बालाजी किणीकर - अंबरनाथ
प्रताप सरनाईक -ओवळा-माजिवडा
एकनाथ शिंदे -कोपरी पाचपाखाडी
प्रकाश सुर्वे - मागाठणे
सुनील राऊत - विक्रोळी
रमेश कोरगावकर - भांडुप पश्चिम
रवींद्र वायकर - जोगेश्वरी पूर्व
सुनील प्रभू - दिंडोशी
रमेश लटके -अंधेरी पूर्व
दिलीप लांडे - चांदिवली
प्रकाश फातर्पेकर - चेंबूर
मंगेश कुडाळकर - कुर्ला
संजय पोतनीस -कलिना
सदा सरवणकर - माहिम
अजय चौधरी - शिवडी
यामिनी जाधव - भायखळा
महेंद्र थोरवे - कर्जत
महेंद्र दळवी - अलिबाग
भरत गोगावले - महाड
ज्ञानराज चौगुले - उमरगा
कैलास पाटील -उस्मानाबाद
तानाजी सावंत - परांडा
शाहजी बापू पाटील - सांगोला
महेश शिंदे - कोरेगाव
शंभूराजे देसाई -पाटण
योगेश कदम - दापोली
भास्कर जाधव - गुहागर
उदय सामंत - रत्नागिरी
राजन साळवी -राजापूर
वैभव नाईक - कुडाळ-मालवण
दीपक केसरकर - सावंतवाडी
प्रकाश आबिटकर - राधानगरी
अनिल बाबर - खानापूर

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार
जयंत पाटील - इस्लामपूर
दिलीप वळसे पाटील - आंबेगाव
धनंजय मुंडे - परळी
मनोहर चंद्रिकापुरे - अर्जुनी मोरगाव
धर्माराव अत्राम - अहेरी (स्वाक्षरी नाही)
इंद्रनील मनोहर नाईक - पुसद
चंद्रकांत नवघरे - वसमत
राजेश टोपे - घनसावंगी
नितीन पवार - कळवण
छगन भुजबळ - येवला
माणिकराव कोकाटे - सिन्नर
दिलीप बनकर - निफाड
नरहरी झिरवळ - दिंडोरी  (पत्र)
सरोज अहिरे -देवळाली
सुनील भुसारा - विक्रमगड
जितेंद्र आव्हाड -मुंब्रा-कळवा
नवाब मलिक - अणुशक्तीनगर
अदिती तटकरे - श्रीवर्धन
अतुल बेनके - जुन्नर
अनिल देशमुख - काटोल
दिलीप मोहिते - खेड-आळंदी
अशोक पवार - शिरुर
दत्तात्रय भरणे - इंदापूर
सुनील शेळके - मावळ
अण्णा बनसोड - पिंपरी (स्वाक्षरी नाही)
सुनील टिंगरे - वडगाव शेरी
चेतन तुपे - हडपसर
डॉ. किरण लहामटे - अकोले
आशुतोष काळे - कोपरगाव
प्राजक्त तनपुरे - राहुरी
निलेश लंके - पारनेर
संग्राम जगताप - अहमदनगर शहर
रोहित पवार - कर्जत-जामखेड
प्रकाश सोळंके - माजलगाव
संदीप क्षीरसागर - बीड
बाळासाहेब आजबे - आष्टी
संजय बनसोडे - उदगीर
बबन शिंदे - माढा
यशवंत माने - मोहोळ
भारत भालके - पंढरपूर
दीपक चव्हाण - फलटण
मकरंद जाधव - वाई
बाळासाहेब पाटील - कराड उत्तर
शेखर निकम - चिपळूण
राजेश पाटील - चंदगड
हसन मुश्रीम - कागल
राजेंद्र शिंगणे - सिंदखेडराजा
मानसिंग नाईक - शिराळा
सुमन पाटील - तासगांव-कवठे महांकाळ
अनिल पाटील - अमळनेर
दौलत दरोडा - शहापूर
अजित पवार - बारामती (स्वाक्षरी नाही)
राजकुमार कारेमारे - तुमस
बाबासाहेब पाटील - अहमदपूर

काँग्रेस आमदार
के सी पाडवी - अक्कलबुवा
शिरीशकुमार नाईक - नवापूर
कुणाल पाटील - धुळे ग्रामीण
शिरीष चौधरी - रावेर
राजेश एकाडे - मलकापूर
अमित झनक - रिसोड
सुलभा खोडके - अमरावती
यशोमती ठाकूर - तेवसा
बळवंत वानखेडे - दर्यापूर
रणजीत कांबळे - देवळी
केदार छत्रपाल - सावनेर
राजू पारवे - उमरेड
विकास ठाकरे - नागपूर पश्चिम
नितीन राऊत - नागपूर उत्तर
नाना पटोले - साकोली
सहश्रम कोरोटे - आमगाव
सुभाष धोटे - राजुरा
विजय वडेट्टीवार - ब्रह्मपुरी
प्रतिभा धानोरकर - वरोरा
माधवराव जवळगावकर - हदगाव
अशोक चव्हाण - भोकर
मोहनराव हंबर्डे - नांदेड दक्षिण
रावसाहेब अंतापूरकार - देगलूर
सुरेश वरपुंडकर - पाथरी
कैलास गोरंतयाल - जालना
हिरामन खोसकर - इगतपुरी
अस्लम शेख - मालाड पश्चिम
झिशान सिद्दीकी - वांद्रे पूर्व
वर्षा गायकवाड - धारावी
अमीन पटेल - मुंबादेवी
संजय जगताप - पुरंदर
संग्राम थोपटे - भोर
बाळासाहेब थोरात - संगमनेर
लहू कानडे - श्रीरामपूर
धीरज देशमुख - लातूर ग्रामीण
अमित देशमुख - लातूर शहर
प्रणिती शिंदे- सोलापूर शहर मध्य
पृथ्वीराज चव्हाण -कराड दक्षिण
ऋतुराज पाटील - कोल्हापूर दक्षिण
पी. एन. पाटील - करवीर
चंद्रकांत जाधव - कोल्हापूर उत्तर
राजू आवळे - हातकणंगले
विश्वजीत कदम - पलुस-कडेगाव
विक्रमसिंह सावंत - जत

अन्य आणि अपक्ष आमदार
मंजुळा गावित - साक्री
चंद्रकांत पाटील - मुक्ताईनगर
राजकुमार पटेल (प्रहार जनशक्ती पक्ष) - मेळघाट
बच्चू कडू (प्रहार जनशक्ती पक्ष) - अचलपूर
आशिष जयस्वाल - रामटेक
शंकरराव गडाख - नेवासा
राजेंद्र पाटील यड्रावकर - शिरोळ
अबू आझमी - मानखुर्द
रईस शेख - भिवंडी पूर्व
देवेंद्र भुयार - मोर्शी