Rohit Pawar Corona Positive : राज्यात कोरोना महामारीचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. यामध्ये राज्यातील नेतेमंडळींनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील काही मंत्र्यांना आणि आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातच आता कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनाही कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची तब्येत व्यवस्थित असून ते घरीच उपचार घेत असल्याच सांगण्यात आलेय. रोहित पवार यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटेलय की, तुमच्या सोबत त्याच्याशी लढत असताना गेली दोन वर्षे त्याला हुलकावणी देत होतो, पण अखेर त्याने मला गाठलंच. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली. पण आपला आशीर्वाद असल्याने काळजीचं काही कारण नाही. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावेत!


राज्यातील कोरोनाचे आकडे पुन्हा वाढत आहेत. याला राज्यातील नेतेमंडळी देखील हातभार लावत आहेत का? असा सवाल उपस्थित होतोय. कारण बड्या विवाहसोहळ्यांना उपस्थिती दर्शवलेल्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हजारोंची गर्दी असलेल्या विवाहसोहळ्यांसह अनेक राजकीय कार्यक्रमांना सार्वजनिक ठिकाणी ही नेतेमंडळी हजेरी लावत होते. 


 






या नेत्यांना कोरोनाची लागण
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
आदिवासी मंत्री के. सी. पाडवी 
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर
खासदार सुप्रिया सुळे
आमदार सागर मेघे
आमदार राधाकृष्ण विखे पाटील
आमदार शेखर निकम
आमदार इंद्रनील नाईक
आमदार चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर)
आमदार माधुरी मिसाळ
माजी मंत्री दिपक सावंत
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
माजी मंत्री पंकजा मुंडे
आमदार धीरज देशमुख