गडचिरोली :  गडचिरोली पोलीस दलाची मोठी कारवाई करण्यात आली आहे.  नक्षल्यांनी पुरुन ठेवलेले स्फोटक साहित्य हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. उपविभाग कुरखेडा अंतर्गत पोस्टे पुराडा हद्दीमध्ये मौजा जामटोला, बंजारी रिठ जंगल परिसरात ही घटना घडली आहे.  कोरची दलम- टिपागड एलओएस व कंपनी क्र. 04 च्या नक्षलवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य करण्यासाठी  जिवंत कुकर बॉम्ब  पुरून ठेवले होते. जिवंत कुकर बॉम्ब बीडीडिएस पथकाच्या मदतीने यशस्वीरित्या जागेवरच नष्ट करण्यात आले. सध्या जिल्हाभरात नक्षलविरोधी अभियान करण्यात  तीव्र करण्यात आले आहे. 


गडचिरोली पोलीस दलाला शोध मोहिमेदरम्यान मोठे यश मिळाले.नक्षल्यांनी पुरुन ठेवलेली स्फोटके आणि साहित्य हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.  कुरखेडा उपविभागाअंतर्गत पोस्टे पुराडा हद्दीमध्ये मौजा जामटोला, बंजारी रिठ जंगल परिसरात विशेष शोधमोहीम राबविली जात होती.  त्यादरम्यान कोरची दलम- टिपागड एलओएस व कंपनी क्र. 04 च्या नक्षलवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य करण्यासाठी पुरून ठेवलेले जिवंत कुकर बॉम्ब  आणि बॉम्ब बनविण्याचे साहित्य जमिनीखालून बाहेर काढण्यात आले. जिवंत कुकर बॉम्ब बीडीडिएस पथकाच्या मदतीने यशस्वीरित्या जागेवरच करण्यात नष्ट आला. 


गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुढील तीन महिने नक्षली पोलिसांवर सर्वाधिक हल्ल्याच्या योजना आखतात. नक्षल घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारच्या शस्त्र व स्फोटक साहित्याचा वापर करतात. हे साहित्य ते मोठया प्रमाणात खरेदी करुन ठेवतात व जंगल परिसरातील जमिनीत गोपनियरित्या पुरुन ठेवतात. तसेच काही ठिकाणी रस्ते तसेच सुरक्षा दलांना धोका होऊ  शकेल अशा इतर ठिकाणी स्फोटके, शस्त्र साहित्य व दारुगोळा इत्यादी ते गोपनियरित्या जमिनीत पुरुन ठेवतात.


या जप्तीत जिवंत कुकर बॉम्ब 1 नग, कुकर 4 नग, जिवंत डेटोनेटर 1 नग, जिलेटीन (जेली) 4 नग, स्प्रिन्टर लोखंडी तुकडे 6 नग, गन पावडर 45 ग्रॅम,  मोबाईल चार्जर स्विच 1 नग, तुटलेला मोबाईल चार्जर 1 नग, नक्षल शर्ट 1 नग, नक्षल पॅन्ट 1 नग व नक्षल पुस्तके आदी ताब्यात घेण्यात आले. या घटनेनंतर जिल्हाभरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha