मुंबई : महाराष्ट्रातील 27 महापालिकांतील नगरसेवकांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात आली आहे.
मुंबईतील नगरसेवकांच्या मानधनात अडीचपटीने वाढ करण्यात आली आहे. नगरसेवकांचं मानधन 10 हजार रुपयांवरुन 25 हजार रुपये करण्यात आलं आहे.


अ श्रेणी - पुणे, नागपूर - 166% नी वाढ (7 हजार 500 वरुन 20 हजार)
ब श्रेणी - ठाणे, पिंपरी - 100% नी वाढ (7 हजार 500 वरुन 15 हजार)
क आणि ड  श्रेणीनवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद, वसई-विरार - 33% नी वाढ (7 हजार
500 वरुन 10 हजार)

राज्य सरकारने नगरसेवकांचं मानधन वाढवलं आहे. 27 महापालिकांमध्ये एकूण 2 हजार 700 हून अधिक नगरसेवक आहेत. लोकसंख्या, महसूल उत्पादन आणि इतर पायाभूत सुविधांच्या आधारे महापालिकांची अ+, अ, ब, क आणि ड अशी वर्गवारी केली जाते.

मुंबई महापालिकेत 232 नगरसेवक आहेत. 2010 मध्ये त्यांचं मानधन निश्चित करण्यात आलं होतं. त्यानंतर सातत्याने ते वाढवण्याची मागणी केली जात होती. टेलिफोन, स्टेशनरी यांच्यावरील खर्च 2010 पासून मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे मानधनात वाढ करण्यात आली आहे. मानधनाशिवाय नगरसेवकांना बैठकांसाठी दरमहा सहाशे रुपयांपर्यंत भत्ता मिळतो.