नागपूर : नागपुरात जमावाकडून मारहाण झालेल्या भाजप कार्यकर्त्याकडे गोमांसच असल्याचं निष्पन्न झालं आहे. एफएसएलच्या अहवालात ही माहिती समोर आल्याचं 'एबीपी माझा'ला विश्वसनीय सुत्रांनी सांगितलं आहे.

सलीम इस्माइल शाह यांना नागपुरातील भारसिंगीमध्ये 12 जुलै रोजी गोमांस बाळगल्याच्या कारणावरुन जमावाने बेदम मारहाण केली होती. त्यानंतर शाह यांनी गोमांस नसल्याचा दावा केला होता. मात्र फॉरेन्सिक अहवालात कार्यकर्त्याचं बिंग फुटलं आहे.

काय आहे प्रकरण?

सलीम 12 तारखेला त्याच्या दुचाकीवरुन डिक्कीत मांस घेऊन चालले होते. त्यावेळी अचानक समोरुन आलेल्या जमावाने त्याला थांबवलं आणि मारहाण करायला सुरुवात केली.

गर्दीतल्या अनेकांनी त्यांना ओढून रस्त्यावर फेकलं आणि लाथा बुक्क्यांनी मारलं. हे गोमांस नसल्याचं ते वारंवार सांगत होते, मात्र कोणीही त्यांचं ऐकलं नाही. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांची सुटका केली.

मारहाण केल्याप्रकरणी मोरेश्वर तांडुलकर, जगदिश चौधरी, अश्विन उईके आणि रामेश्वर तायवाडे या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

संबंधित बातम्या :


नागपुरात स्वयंघोषित गोरक्षकांची गुंडगिरी, मांस विक्रेत्याला जबर मारहाण