यवतमाळ: आज धनत्रयोदशी (Dhanteras 2022) अनेक नागरिक हे एक ग्रॅम का होईना सोने खरेदी करताना दिसतात. मात्र, यवतमाळच्या (Yavatmal News) सराफा लाईनमध्ये पहाटेपासून, सोनझारी नावाने प्रसिद्ध असलेला कामगारवर्ग हा सोनाराच्या दुकानमोरील (Goldsmith Shop) सोन्याचा कण अन् कण आपल्या बारिक झाडूनी गोळा करतात. परंपरागत व्यवसाय करताना त्यांना अठरा विश्व दारिद्र्याचा सामना मात्र करावा लागत आहे.


भल्या पहाटेच सोनार लाइन झाडून काढणाऱ्या महिला यवतमाळमध्ये (Yavatmal) पाहायला मिळतात. स्वच्छतेचे काम करताना सोनझारी महिला ब्रश, झाडू आणि खराट्यांच्या माध्यमातून झाडून काढत सोन्याचा शोध घेतात. यासाठी सोनार लाईनमधील ओटा, दुकानासमोरील जागा या महिला साफ करतात. हा संपूर्ण परिसर झाडल्यानंतर त्यांच्या हातात माती येते. त्या परिसरातील जमा झालेली ही माती महिलावर्ग घरी घेऊन जातात.  या मातीला स्वच्छ पाण्यात धुतले जाते. त्याकरता खरी अथवा विशिष्ट प्रकारचे लाकडी टोपले वापरले जाते. त्यावर माती झारल्या जाते. यातून कुठेतरी कधीतरी एखादा सोन्याचा कण हाती लागतो. हे कण गोळा  केल्यानंतर आठवडाभरातील कण गोळा करून ते सोनाराकडे नेले जातात. यातून जे काही पैसे हातात पडतील, त्यावर या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.


 यवतमाळच्या सराफा लाईनमध्ये गेल्यास सकाळी सहापासून काही महिला हातात झाडू, ब्रश, झाडू घेऊन रस्ता साफ करताना दिसतात. त्यांच्या टोपल्यात केवळ माती  दिसते.  मेहनत करून घरी आल्यावर स्वच्छ पाण्यात माती साफ केली जाते. त्यात एखादा सोन्याचा, चांदीचा कण मिळतो. आठवडाभर असे सोन्याचे कण जमा केल्यावर घरीच भट्टी पेटवली जाते. त्यात सोन्याला झळाळी मिळताच सराफाकडे आणून विक्री करतात. त्यातून मजुरी कधी तीन हजार, कधी दोन हजार रुपये हाती पडते.


सोने शोधण्यासाठी महिलांना अनेकदा घाण नालीच्या पाण्यातही  उतरून सोन्याच्या शोध घ्यावा लागतो.  दिवसभर पाण्यात राहून सोन्याचा अहोरात्र शोध घेतात. इतकी अंगमेहनत करून त्यांच्या हातात काही पडेल, याची शाश्वती नाही. साफसफाई करून राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्या सोनझारी कामगार वर्गासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. कधीतरी एखादा सोन्याचा कण हाती लागतो. हे कण गोळा  केल्यानंतर आठवडाभरातील कण गोळा करून ते सोनाराकडे नेले जातात. यातून जे काही पैसे हातात पडतील, त्यावर या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.


संबंधित बातम्या:


Jalgaon Gold News : खरेदीचा 'सोनेरी' मुहूर्त; जळगावच्या सुवर्ण नगरीत धनत्रयोदशीच्या निमित्ताने सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी