यवतमाळ : लॉकडाऊनमुळे पोटाची खळगी भरू न शकल्यानं मजुरांचं स्थलांतर सुरुच आहे. अशावेळी त्यांच्या अपघातांची मालिकाही सुरुच आहे. औरंगाबादमध्ये घडलेल्या अपघाताची घटना ताजी असतानाच, यवतमाळमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसनं टिप्परला धडक दिल्यानं मोठा अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील 4 जणांचा मृत्यू झाला असून त्यात एसटी ड्रायव्हरचाही समावेश आहे. तर 22 जण जखमी आहेत. यवतमाळच्या आर्णी नजिकच्या कोळवन गावात हा अपघात झाला. सध्या जखमींवर आर्णीच्य गामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही बस मजुरांना घेऊन सोलापुरहून झारखंडच्या दिशेनं निघाली होती.


पाहा व्हिडीओ : सोलापूरहून झारखंडला जाणाऱ्या मजुरांच्या एसटी बसला अपघात; 3 मजुरांचा मृत्यू तर 22 जखमी



आर्णी तालुक्यात पहाटे साडेतीनच्या सुमारास मजुरांच्या बसला हा भीषण अपघात झाला. एसटीने मागून टिप्परला धडक दिली असल्यामुळे एसटीच्या पुढच्या भागाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तर जखमींवर आर्णी जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही एसटी सोलापूर येथून मजुरांना घेऊन झारखंडच्या दिशेने जात होती पण दुर्दैवाने वाटेतच हा अपघात झाला. या अपघातातील जखमींना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


भुसावळला पायी जाणाऱ्या मजुरांना मालगाडीची धडक; 16 मजुरांचा मृत्यू, तर एक जण जखमी


नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरु असल्यामुळे या रस्त्यावरून टिप्परच्या फेऱ्या सुरु असतात. आजही हा टिप्पर कामाच्या ठिकाणी जात होता. सध्या देशात लॉकडाऊन सुरु आहे. 18 मेपासून लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झाला आहे. लॉकडानमुळे अनेक मजुर देशभरात अडकले आहेत. लॉकडाऊनमुळे कामधंदे बंद असल्यामुळे त्यांच्या खिशात पैसे नाहीत, हाताला काम नाही. अशा अवस्थेत कोरोनाची भीती विसरुन हे मजूर आपल्या मूळ गावी परतण्यासाठी धडपड करत आहे. मजुरांचं हे स्थलांतर फाळणीनंतरचं सर्वात मोठं स्थलांतर असल्याचं सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्येही रेल्वे रूळावरून चालत जाणाऱ्या मालगाडीखाली येऊन 16 मजुरांचा मृत्यू झाला होता.


संबंधित बातम्या : 


उत्तर प्रदेशातील औरैयात प्रवासी मजुरांच्या ट्रकला भीषण अपघात; 23 जणांचा मृत्यू तर 15 जखमी