देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. रेड झोनमधील निर्बंध शिथिल करणे योग्य होणार नाही, लॉकडाऊन 4 संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद, पावसाळ्यापूर्वी कोरोनाचं संकट संपवायचंय, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य


2. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच, 2033 नवीन रुग्णांची भर, कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 35 हजार 058 वर, तर 749 रुग्ण कोरोनामुक्त


3. जगभरात 48 लाखांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण, रशियात कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 90 हजार, तर एकट्या अमेरिकेत तब्बल 91 हजार जणांचा मृत्यू


4. समग्र शिक्षा अभियानाच्या मोफत पाठ्यपुस्तकांच्या वितरणाचा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते शुभारंभ, राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या लाभार्थी विद्यार्थ्यांना दिलासा


5. केंद्र सरकार स्थलांतरीत मजुरांचे 85% रेल्वे भाडे देते याचा पुरावा द्या अन्यथा जनतेची माफी मागा; काँग्रेसचं चंद्रकांत पाटील यांना आव्हान, भाजप नेते दिशाभूल करत असल्याचाही आरोप


6. जम्मू काश्मीरच्या नवाकदल परिसरात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक, श्रीनगरमधील मोबाईल इंटरनेट सेवा आणि खासगी कंपन्यांची वॉईस कॉल सुविधा बंद


7. अॅम्फान चक्रीवादळ 20 मे रोजी पश्चिम बंगालच्या दीघा समुद्रकिनारी धडकण्याचा अंदाज, जीवितहानी रोखण्यासाठी खबरदारी म्हणून एनडीआरएफची 53 पथकं तैनात


8. अन्नपदार्थांची डिलिव्हरी करणाऱ्या स्विगी कंपनी 1100 कर्मचाऱ्यांची कपात करणार, कोरोना संकटामुळे व्यवसायात झालेल्या तोट्यामुळे निर्णय, कर्मचाऱ्यांना ई-मेलद्वारे माहिती


9. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकाला पत्नी आलियाकडून घटस्फोटाची नोटीस, 7 मे रोजी नोटीस पाठवून तलाक आणि पोटगी मागितल्याची आलियाची माहिती


10. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा साखरपुडा, स्वत:च्या वाढदिवशीच चाहत्यांना सरप्राईज, फेब्रुवारी महिन्यात कुणाल बेनोडेकरसोबत साखरपुडा झाल्याची गोड बातमी शेअर