Maharashtra Weather Updates : राज्यात थंडीचा जोर (Cold Weather) कायम आहे. मात्र, काही भागात किंचित थंडी कमी झाली आहे. त्यामुळं काही भागात नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर काही भागात अद्यापही हुडहुडी कायम आहे. उद्यापर्यंत म्हणजे 26 जानेवारीपर्यंत थंडी वाढणार नसल्याचा अंदाज हवामान विभागानं (Meteorological Department) वर्तवला होता. पाहुयात कोणत्या जिल्ह्याती किती तापमानाची नोंद झाली...


राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर भारतात थंडी अद्यापही कायम आहे. राज्यातील इतर भागात थंडीचा जोर काहीसा कमी झाला आहे. त्यामुळं नागरिकांना थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. ज्या ठिकाणी थंडीचा जोर कायम आहे, त्या ठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत.  


कुठे किती तापमान? 


(अंश सेल्सिअसमध्ये) 


मुंबई (सांताक्रुज) 15.6
पुणे 13.5 
सातारा 18.2 
कोल्हापूर 18.8 
नवी मुंबई 19 
नांदेड 18.8 
उदगीर 18.5
कुलाबा 17.6 
सोलापूर 20.9 
परभणी 17.4 
बारामती 16.9 
महाबळेश्वर 14.9 
डहाणू 16
जळगाव 16.4
उस्मानाबाद 18.4 
रत्नागिरी 19.8 
माथेरान 12.4 
जालना 16.6 
औरंगाबाद 13.2 
नाशिक 12.6


Agriculture Crop : वाढत्या थंडीचा पिकांवर परिणाम


एकीकडे राज्यात तापमानात वाढ होत असताना नागरिकांना दिलासा मिळत आहे मात्र दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) अजूनही थंडीचा कडाका (Cold Wave) कायम आहे.  धुळे (Dhule) जिल्ह्यातील तापमानाचा पारा घसरल्यानं त्याचा परिणाम रब्बी हंगामाच्या पिकांवर (Rabi Crop) होत आहे. धुळे जिल्ह्यातील बहुतांश भागात कांदा पिकावर करपा रोगाचा (Karpa) प्रादुर्भाव वाढला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच गहू, हरभरा, मका या पिकांना देखील या वातावरणाचा फटका बसणार असून उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


Rabi Crop : खरीपानंतर रब्बी हंगाम वाया जाण्याची भीती


आधीच शेतकऱ्यांच्या पिकांना अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला होता. त्यामुळं हाती आलेली खरीपाची पीक वाया गेली होती. त्यामुळं शेतकऱ्यांची उरली सुरली सगळीआशा आता रब्बी हंगामाच्या पिकांवर आहे. अशातच आता हवामान बदलाचा मोठा फटका पिकांना बसत आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. जालना जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात लागवड झालेल्या हरभरा पिकावर सध्या बदलत्या वातावरणामुळं घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळं घाटे अळीच्या नुकसानीची पातळी ओळखून शेतकऱ्यांनी एकात्मिक पद्धतीने हरभऱ्याचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


India Weather Update : कुठे पाऊस तर कुठे बर्फवृष्टी, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज..