Maharashtra Weather Update:  सध्या पश्चिमी चक्रावताच्या प्रभावामुळे हिमाचल प्रदेश उत्तराखंड, दिल्ली अशा उत्तरेकडील राज्यांमध्ये तुफान पाऊस सुरू आहे . तर दक्षिणेकडील राज्यांमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे . महाराष्ट्रात तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून आता येत्या चार दिवसात कोकणपट्ट्यासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अवकाळी पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत . (IMD forecast) दरम्यान आज संपूर्ण महाराष्ट्रात सामान्य तापमान होऊन अधिक तापमानाची नोंद झाली .राज्यभरात आता प्रचंड रखरख वाढली आहे .उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत .

Continues below advertisement


येत्या पाच दिवसाचा हवामान अंदाज काय ?


हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती राजस्थान सह मध्य प्रदेश व खालपर्यंत सक्रिय असल्याने महाराष्ट्रात पुढील पाच दिवस अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे . 3-4 व 5 मे रोजी विदर्भासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचे इशारे आहेत . त्यानंतर उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही जिल्हांमध्ये अवकाळी पाऊस येणार आहे . गेल्या आठवडाभरापासून  विदर्भातील  काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला होता . 


तापमान प्रचंड वाढले, पारा 40 अंशांच्या पुढे


राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा प्रचंड वाढला आहे .आजपासून ( 3 एप्रिल ) पुढील पाच दिवस बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे .अवकाळी पावसाची शक्यता असली तरी तापमानाचा पारा 40° च्या पुढेच असल्याची नोंद होत आहे . प्रचंड उकाडा वाढला आहे .नागरिकांना घराबाहेर पडताना धडकी भरेल एवढं तापमान नोंदवला जात असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे . गेल्या चार ते पाच दिवसांपासून सोलापूर मध्ये तापमान 45 अंशांच्या उंबरठ्यावर आहे .विदर्भात पावसाचा इशारा असला तरी 42 ते 45 अंशापर्यंत तापमान टेकलं आहे .मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून कमाल तापमान 40 ते 45 अंशापर्यंत गेलंय . अनेक भागांमध्ये दुपारच्या वेळी शुकशुकाट झालाय .रस्ते ओस पडले आहेत .


आज कोणत्या शहरात किती तापमान?


सोलापूर 44.7, अकोला 44.9, जळगाव 43.9, अमरावती 43.4, बीड 42.8, नांदेड 42.3, चंद्रपूर 42.2, वाशिम 42.6, परभणी 41.4, लातूर 41.0, सांगली 41.0, उस्मानाबाद 41.5, वर्धा 40.5, पुणे 40.6, सातारा 40.6, नाशिक 39.9, गडचिरोली 39.0, सिंधुदुर्ग 39.0, नागपूर 39.4, ठाणे 37.0, पालघर 36.4, रायगड 36.2, गोंदिया 36.0, भंडारा 36.0, मुंबई उपनगर 34.4, मुंबई शहर 34.2, रत्नागिरी 34.2


पावसाचे इशारा कुठे व कधी?


3 एप्रिल: नाशिक,अमरावती, यवतमाळ ,नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया ,गडचिरोली अवकाळी पावसाचे येलो अलर्ट 


पुणे, अहिल्यानगर ,धुळे, नंदुरबार ,नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांना हलक्या पावसाचा इशारा आहे .


4 एप्रिल: नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार,अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली -अवकाळी पावसाचा येलो अलर्ट


मुंबई, ठाणे ,रायगड ,पुणे ,सातारा, बीड ,जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हांमध्ये पावसाची शक्यता आहे .


5 एप्रिल : संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता .मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाडा विदर्भ सर्व विभागांमध्ये बहुतांश ठिकाणी अलर्ट .


6 एप्रिल : सातारा पुणे ठाणे पालघर नाशिक अहिल्यानगर बीड जालना छत्रपती संभाजी नगर जळगाव धुळे नंदुरबार यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट .


कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात उर्वरित ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज


 7 एप्रिल : संपूर्ण कोकणपट्टा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र व बहुतांश मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय .यात विदर्भाचा समावेश नाही .


हेही वाचा:


Sanjay Shirsat : लाडक्या बहीण योजनेसाठी मागासवर्गीय अन् आदीवासींचा निधी वळवला; खात्याचे मंत्री संजय शिरसाटांचा संताप, म्हणाले, 'खातं बंद केलं तरी चालेल...'