Maharashtra Weather Update Today : राज्यात गेल्या काही दिवसात हवामानात मोठा बदल झाला आहे. आजही राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता (Rain Updates) आहे. मिचॉन्ग चक्रीवादळामुळे (Cyclone Michaung) राज्यासह देशातील अनेक भागात अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) शक्यता आहे. आता वादळाचा (Cyclone Effect) प्रभाव कमी झाला असला तरी पावसाची शक्यता (Rain Alert) अद्याप कायम आहे.


कोकण, विदर्भात पावसाची शक्यता


राज्यात (Maharashtra Weather Update) पुढील 24 तासांत कोकण (Kokan) आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची (Rain News) शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. राज्यात काही ठिकाणी थंडीचा कडाका (Cold Weather) वाढला असून तर काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. गेल्या काही दिवसात वातावरणात बदल झाल्याने थंडीची (Winter) वाट पाहावी लागली. मात्र, येत्या आठवड्यात राज्यात थंडी वाढण्याची शक्यता (Maharashtra Cold Weather) आहे.


दोन-तीन दिवस पावसाचा अंदाज


हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये पुढील 2 ते 3 दिवस हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरळ, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल या भागात पावसाची शक्यता आहे. आज हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे तर, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्ली आणि लखनौमध्ये किमान तापमानात घट झाली आहे. पर्वतीय भागात बर्फवृष्टीचा परिणाम उत्तर भारतातील हवामानावर दिसून येत असून उत्तर भारतात अनेक भागात तापमानात घट झाली आहे.


मुंबईत थंडी वाढणार


महाराष्ट्राच्या हवामानातील सततच्या बदलांमुळे आता मुंबईत गुलाबी थंडी पडणार आहे. मात्र, रात्री थंडी जाणवली तरी, मुंबईकरांना दिवसा उन्हाचा सामना करावा लागणार आहे. महाराष्ट्रात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता कायम असून आता हलक्या थंडीला सुरुवात होणार आहे. मुंबईच्या किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील वाऱ्यांमुळे रात्रीचे तापमान 18 ते 19 अंशांपर्यंत खाली घसरेल. 


हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकरांना रात्री उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. पण दिवसभरात तापमान 30 अंश सेल्सिअसच्या पुढे राहील. मुंबईत आर्द्रता 65 टक्क्यांवरून 55 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. मुंबईकरांना आर्द्रतेपासून दिलासा मिळणार आहे. मात्र, रात्रीचे तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस राहील.


महत्वाच्या इतर बातम्या : 


Onion Price : कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारचा मेगा प्लॅन तयार, शेतकऱ्यांना दिलासा देणारा 'हा' मोठा निर्णय घेतला