NPCIL Recruitment 2023: न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं ट्रेड अप्रेंटिसच्या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. त्यांच्यासाठी अर्जाची लिंक 11 जानेवारी 2023 पासून सक्रिय झाली आहे. तर या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जानेवारी 2023 आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे, त्यांनी अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात अर्ज करावेत. या भरती मोहिमेद्वारे ट्रेड अप्रेंटिसची एकूण 295 पदं भरण्यात येणार आहेत. ही भरती तारापूर, महाराष्ट्रातील प्लांटसाठी केली जात आहे. 


अधिक माहिती कशी मिळवाल? 


NPCIL च्या या पदांसाठी अर्ज करण्यासाठी किंवा या रिक्त पदांबद्दल तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. npcil.nic.in. या अधिकृत वेबसाईटवर जाऊन  भरतीसाठी अर्ज करु शकता. या भरती प्रक्रियेसाठी केवळ ऑनलाईन अर्ज करता येतील. इतर कोणत्याही माध्यमातून केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही, असं अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आलं आहे. 


रिक्त जागांचे तपशील


न्यूक्लियर पावर कॉरपोरेशन ऑफ इंडियामध्ये कोणत्या पदांसाठी भरती आहे, त्याचे तपशील जाणून घ्या... 


फिटर : 25 पदं
टर्नर : 09 पदं
इलेक्ट्रिशियन : 33 पदं
वेल्डर : 38 पदं
इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक : 16 पदं
इंस्ट्रूमेंट मॅकेनिक : 6 पदं
रेफ्रिजरेशन आणि एसी मॅकेनिक : 20 पदं
सुतार : 19 पदं
प्लंबर : 20 पदं
वायरमन : 16 पदं
डिझेल मॅकेनिक : 07 पदं
यांत्रिक मोटर वाहन : 07 पदं
मशीनिस्ट : 13 पदं
पेंटर : 18 पदं
ड्राफ्ट्समन (मॅकेनिक) : 02 पदं
ड्राफ्ट्समन (सिविल) : 02 पदं
माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान प्रणाली देखभाल : 18 पदं
कंप्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट : 18 पदं 
स्टेनोग्राफर (अंग्रेजी) : 02 पदं
स्टेनोग्राफर (हिंदी) : 02 पदं
सचिव सहायक : 04  पदं


कोण करू शकतं अर्ज? 


संबंधित विषयातील ITI प्रमाणपत्र असलेले उमेदवार NPCIL च्या या पदांसाठी अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 14 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावं. 25 जानेवारी 2023 पासून वयाची गणना केली जाईल. ITI च्या सर्व सेमिस्टरमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. तपशील जाणून घेण्यासाठी, आपण अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.


अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Pune Job Vacancy : पुण्यात दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी मिळणार नोकरीची संधी; पहिल्याच ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ला उत्तम प्रतिसाद