Maharashtra weather update: गेल्या 15 दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने तूफान हजेरी लावली .नद्यांना पूर आले . मोठी जीवित हानी झाली . आता पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट हवामान विभागाने दिले आहेत . मुंबईसह कोकणपट्ट्यात तसेच मराठवाडा विदर्भातही पावसाचा जोर पुढील चार दिवस वाढणार आहे .
हवामान विभागाचा अंदाज काय ?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून तो हळूहळू वायव्यकडे सरकत आहे . पुढील पाच दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे .हवामान विभागाने मुंबई उपनगरासह संपूर्ण कोकणपट्ट्यात तसेच विदर्भ मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात पावसाचे हायलर्ट दिले आहेत .तसेच पुढे सातारा कोल्हापूर घाटमाथ्यावर आहे अलर्ट देण्यात आले आहेत .
कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट ?
27 ऑगस्ट : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, कोल्हापूर घाट,पुणे घाट, सिंधुदुर्ग, रत्नागिरी,नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर,सातारा घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट आहे.
28 ऑगस्ट : संपूर्ण कोकणपट्टीत पावसाचा येलो अलर्ट, कोल्हापूर सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, ठाणे, पुणे, नाशिक घाटमाथ्यावर यलो अलर्ट, संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना परभणी, हिंगोली, नांदेड, बीड - यलो अलर्ट
29 ऑगस्ट : मुंबई ठाणे पालघर सह संपूर्ण कोकणपट्टीत पावसाचा येलो अलर्ट, कोल्हापूर सातारा, पुणे, नाशिक घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार , नाशिक, पुणे ,नगर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार,यवतमाळ वगळता संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट
30 ऑगस्ट : रायगड रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट, नाशिक पुणे सातारा व कोल्हापूर घाट माथ्यावर यलो अलर्ट देण्यात आला असून विदर्भात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया,3 चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट देण्यात आलाय .