Maharashtra Weather Update : राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा दिवसागणिक खालावत चालला असतानाच राज्यातील अनेक शहरांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः टाहो सुरू आहे. ही भयावह परिस्थिती एका बाजूने असतानाच अवघा महाराष्ट्र आता उष्णतेच्या लाटांनी होरपळून निघाला आहे. राज्यातील अनेक शहरात उन्हाचा पारा चाळीशीत जाऊन पोहोचला आहे.






आज सोलापूरमध्ये तब्बल 43° सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचल्याने अंगाची लाहीलाही झाली. राज्यातील अनेक शहरांमध्ये चाळिशीच्या पार पारा गेल्याने अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आल्यासारखी स्थिती आहे. हवामान विभागाकडून गरज नसल्यास दुपारच्या वेळेत बाहेर पडू नये असं आवाहन करण्यात येत आहे. जेऊरमध्ये 42 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. कोल्हापूर मध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 


कमाल तापमान  (अंश सेल्सिअसमध्ये) 



उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाकडून इशारा


दरम्यान 5 आणि उद्या 6 एप्रिल रोजी विदर्भ, किनारी आंध्र प्रदेश आणि यानाम, रायलसीमा, गंगा पश्चिम बंगाल, बिहार, तेलंगणा, झारखंड, उत्तर अंतर्गत कर्नाटक आणि ओडिशा या भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. 






विदर्भात काही ठिकाणी ऑरेंज अलर्टसह गारपीट होण्याची शक्यता 


दरम्यान, राज्यात 7 ते 10 एप्रिल दरम्यानय यवतमाळ, वाशिम, अमरावती जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट, हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात काही ठिकाणी ऑरेंज अलर्टसह गारपीट होण्याची शक्यता आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या