Weather Update: गेल्या आठवड्यापासून राज्यात तापमानात चढउतार पहायला मिळत असून अवकाळी पावसासाठी हवामान पोषक होते. आता पुन्हा गारठा सुरु झाला असून तापमान (Temperature) 10 अंशांच्या खाली जात आहे. दरम्यान, आता पुन्हा अरबी समुद्रात आर्द्रता वाढली असून मध्य महाराष्ट्रात चक्राकार वारे सक्रीय झाले आहेत. त्यामुळे राज्यात तापमानात पुन्हा वाढ झाली असून गारठा कमी झालाय. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी किमान तापमान 1-3 अंशांनी वाढल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसात राज्यातील तापमान कमी होणार असल्याचं सांगण्यात आलं असून 3-5 अंशांनी किमान तापमानात घसरण होणार आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय?
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, सध्या विस्टर्न डिस्टर्बन्स उत्तर पाकिस्तान भागात सक्रीय आहे. त्यामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसासह बर्षवृष्टी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, चक्राकार वाऱ्यांची स्थिती मध्य महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या परिसरावर आहे. अरबी समुद्रात आर्द्रता वाढल्याने तापमानात बदल होत आहेत. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात बहुतांश भागात येत्या 2-3 दिवसात तापमान घसरणार असून 3-5 अंशांनी राज्यात किमान तापमानात घट होणार आहे. सोमवारी राज्यात विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यात सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानही वाढलेले होते. आता येत्या २४ तासांत थंडीचा जोर वाढणार आहे.
विदर्भाला इशारा
राज्यात येत्या पाच दिवसात कोरड्या हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आल्याचे प्रादेशिक हवामान केंद्राने केली आहे.
सोलापूरात सर्वाधिक तापमानाची नोंद
राज्यात सोमवारी कमाल व किमान तापमान सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक होते. सोलापुरात 37 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. राज्यातील सर्वाधिक तापमानाची ही नोंद होती. राज्यात उन्हाळ्याला अजून दोन महिने असले तरी तापमानात लक्षणीय वाढ झाल्याची नोंद झाली. सर्वात कमी तापमान जळगावात होते. जळगाव जिल्ह्यात सोमवारी 11 अंशांची नोंद झाली. ही नोंद किमान तापमानाच्या तुलनेत खूप अधिक होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 15 अंशांची नोंद करण्यात आली. मध्य महाराष्ट्रात 11- 15 अंशापर्यंत तापमानाची नोंद झाली.
हेही वाचा: