Maharashtra Weather Update:राज्यभरात पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्र व कोकणात हवामान विभागाने हाय अलर्ट दिले आहेत. मराठवाड्यात पुढील चार दिवस काही जिल्ह्यात पावसाची हजेरी राहणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा  सक्रिय असल्याने महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने वर्तवली आहे. 

Continues below advertisement

हवामान विभागाचा अंदाज काय?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार १३ ते १८ ऑगस्ट दरम्यान मध्य महाराष्ट्र कोकण  व विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. आज (१२ ऑगस्ट ) IMD ने चंद्रपूर ला ऑरेंज अलर्ट दिलाय तर वर्धा नागपूर भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आलाय. दुसरीकडे, कोकणात  बहुतांश ठिकाणी पावसाचे यलो अलर्ट देण्यात आले आहेत.ठाण्यासह पुण्यात सातारा, नगर सांगली, सोलापूर कोल्हापूरमध्ये पावसाचा यलो अलर्ट असून मराठवाड्यात लातूर धाराशिव, बीडमध्ये पावसाचे यलो अलर्ट देण्यात आले आहेत. पुढील चार दिवस विदर्भ व कोकणात पावसाचे ऑरेंज अलर्ट आहेत तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात यलो अलर्ट देण्यात आले आहेत. 

कोकणामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकटात होऊ शकतो. 

Continues below advertisement

पुढील 4 दिवस कुठे कोणते अलर्ट?

13 ऑगस्ट ऑरेंज अलर्ट  – यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीयलो  अलर्ट : अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, जालना, बीड, अहमदनगर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, लातूर, ठाणे, पालघर

14 ऑगस्ट ऑरेंज अलर्ट – नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ

यलो अलर्ट – अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, जालना, बीड, अहमदनगर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, लातूर, ठाणे, पालघर

15 ऑगस्ट 

ऑरेंज  अलर्ट – यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, रत्नागिरी

यलो अलर्ट – नागपूर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, अहमदनगर, पुणे, रायगड, सातारा, ठाणे, पालघर

16 ऑगस्ट 

ऑरेंज अलर्ट – बुलढाणा, अकोला, अमरावती, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे

यलो अलर्ट – नंदुरबार, धुळे, जालना, वाशिम, हिंगोली, जालना, परभणी, नांदेड, कोल्हापूर

विदर्भात बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो.