Ladki Bahin Yojana : एकाच घरातील तीन किंवा त्यापेक्षा अधिक लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांचा लाभ थांबवण्याचा निर्णय शासनाने घेतला. जोपर्यंत सर्वे होऊन एकाच घरातील दोन नाव समोर येत नाहीत तोपर्यंत त्यांना लाभ देता येणार नाही असं शासनाने म्हटलं आहे. मात्र हाच मुद्दा आता छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच घरातील जावा-जावा, सासु-सुनात भांडण लावण्यास कारणीभूत ठरला आहे.
महाराष्ट्रात अपात्र लाडकीबहीण ठरवण्यासाठी अंगणवाडी सेविकांकडून सर्वे केला जातोय. शासनाने एकाच घरातील तीन किंवा त्यापेक्षा अधिक लाडक्या बहिणींची एक यादी जिल्हा प्रशासनाला पाठवली आहे. आणि एकाच घरातील तीन किंवा त्यापेक्षा अधिक लाडक्या बहीण ठरवण्याचा निकष हा रेशन कार्ड ठेवण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर मध्ये एकाच घरातून तीन किंवा त्यापेक्षा अधिक लाडक्या बहिणी लाभार्थींची संख्या 80 हजारापेक्षा अधिक आहे. तर 21 वयापेक्षा कमी वय असणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या ही 20 हजारापेक्षा अधिक आहे. याहीपेक्षा पुढची महत्त्वाची बाब म्हणजे अंगणवाडी सेविका ज्यावेळेस हा सर्वे करायला जातात त्यात त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. एकाच घरातील दोनच लाडक्या बहिणी लाभार्थी ठरवताना सून-सासू आणि जाऊ अशी भांडण लागल्याचा अंगणवाडी सेविकांचा अनुभव आहे.
लाडकी बहीण योजनेतील तब्बल 26 लाख महिलांची गृह चौकशी होणार
लाडकी बहीण योजनेतील लाभ घेतलेल्या तब्बल 26 लाख महिलांची गृह चौकशी होणार आहे. एका घरामध्ये दोन पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नाही. मात्र, दोन पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेल्या तब्बल 26 लाख महिलांची यादी महिला व बालकल्याण विभागाने तयार केली आहे. या सर्व महिलांची विभागानुसार चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.
एकाच घरामध्ये दोन पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असेल तर त्या जास्तीच्या महिलांना मिळणारा योजनेचा लाभ बंद होणार आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ सध्या 2 कोटी 29 लाख महिलांना मिळत आहे. त्यामुळे ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर आणखी महिला लाडकी बहीण योजनेतून वगळल्या जाणार आहेत.
दरम्यान, योजनेच्या नियमानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 1500 रुपये प्रतिमहिना दिले जातात. तर, ज्या महिला शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेता लाभ घेतात त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 500 रुपये दिले जातात.
ही बातमी वाचा: