Maharashtra weather today: आज पासून पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील कोकण,मुंबई, पुणे तसेच संपूर्ण विदर्भात मुसळधार त्यातील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे . हवामान विभागाने मराठवाड्यातही जोरदार पावसाची हजेरी राहणार असल्याचे सांगितले आहे . गेल्या दोन दिवसांपासून राज्यात किनारपट्टी भागात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे . राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार आहे . पुढील चार दिवस हवामान विभागाने पावसाचे तीव्र अलर्ट दिले आहेत .
राज्यभर पावसाचा अंदाज काय ?
आज दुपारून पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे . उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना आज पावसाचे यलो अलर्ट दिले आहेत . तर नाशिक व पुणे घाट परिसरासह पालघर ठाणे रायगड रत्नागिरी मध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत .आज मुंबई ठाणे परिसरात जोरदार पाऊस होणार असल्याचं IMD ने सांगितलंय . दरम्यान मध्य महाराष्ट्रात पावसाने काही शिवसंत घेतली असून कोल्हापूर ,सांगली सातारा, पुणे, नगर, सोलापूर तसेच मराठवाड्यातील बीड, धाराशिव ,लातूर या जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही .पुढील चार दिवस कोकण घाटात तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडणार असल्याचं IMD ने सांगितलंय .
हवामान विभागाचा अंदाज काय ?
राष्ट्रीय मौसम पूर्वानुमान केंद्राच्या माहितीनुसार, 25 ते 30 जून या कालावधीत कोकण व गोवा,मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाची शक्यता आहे . मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल . नैऋत्य मौसमी पावसाने आता उत्तर अरबी समुद्राच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे .त्यामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये ही आता कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून बहुतांश प्रदेशात जोरदार पावसाचा इशारा आहे .
कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट ?
ऑरेंज अलर्ट :आज 25 जून रोजी पालघर ठाणे रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे .कोल्हापूर सातारा पुणे व नाशिक घाट परिसरात ही मुसळधार पावसाची शक्यता असून या भागातही ऑरेंज अलर्ट आहे .यलो अलर्ट : छत्रपती संभाजीनगर ,जालना, परभणी ,नांदेड, हिंगोली, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार व संपूर्ण विदर्भात आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे . याशिवाय मुंबई व सिंधुदुर्गातही पावसाचा यलो अलर्ट आहे .
हेही वाचा