राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे  अध्यक्ष अजित पवार पुन्हा एकदा गुलाबमय होण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाला सुद्धा वेग आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीमध्ये  राष्ट्रवादी काँग्रेसने नरेश अरोरा यांच्या डिझाईन बाॅक्स संस्थेची राष्ट्रवादी काँग्रेस मदत घेणार असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत संपूर्ण कॅम्पेन अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून गुलाबी रंगात करण्यात आलं होतं. अजित पवार यांची गाडी सुद्धा गुलाबी करण्यात आली होती. 

Continues below advertisement

नरेश अरोरा अजित पवारांना भेटण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर

त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सुद्धा डिझाईन बॉक्स मदतीला येणार का? याची चर्चा रंगली आहे. नरेश अरोरा अजित पवारांना भेटण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे पोहचले आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या खांद्यावर हात टाकल्याचा नरेश अरोरा यांचा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोंनी राजकीय भूवयाउंचावल्या गेल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नरेश अरोरा यांना पक्षापासून दूर ठेवण्यात आल्यात होतं.  मात्र, आता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी नरेश अरोरा यांची पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेससाठी कॅम्पेन करणार का? याची उत्सुकता आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Continues below advertisement