मुंबई: राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाने (unseasonal rain) हजेरी लावली आहे. काल (सोमवारी) बीड जिल्ह्याला अवकाळी पावसाने (unseasonal rain) झोडपून काढलं. काल (सोमवारी) दुपारनंतर जिल्ह्यातील बीड, गेवराई, पाटोदा, आष्टी आणि केज तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर अनेक ठिकाणी गारपीट देखील झाली. परिणामी काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर (काल) सोमवारी हिंगोली जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वारे अवकाळी पाऊस यासह काही ठिकाणी गारपीट झाली आहे, याचा फटका मोठ्या प्रमाणात शेतातील केळीच्या बागेला बसला आहे. अवकाळी पाऊस आणि गारांमुळे केळींच्या बागांचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे. (Maharashtra Weather Update) 

राज्याच्या कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता ?

महाराष्ट्रात पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे, काही भागात अवकाळी पावसासोबत गारपिटीची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईमध्ये 6 आणि 7 मे रोजी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 5 ते 7 मे दरम्यान नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव अवकाळीच्या पावसासोबतच गारपिटीची शक्यता वर्तवली आहे. अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये 6 व 7 मे रोजी पावसाची शक्यता वर्तवली आहे, मराठवाड्यात 7 मे रोजी, विदर्भात देखील अवकाळी पावसासोबतच गारपिटीची शक्यता आहे. 

मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, घाटपरिसर, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, कोकण-गोवा या विभागांमध्ये आज आणि उद्या पावसाचा अलर्ट आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, बीड, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, या जिल्ह्यांमध्ये आज (मंगळवारी) वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

बीडमध्ये अवकाळी पावसानं झोडपले

बीड जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढलं. काल (सोमवारी) दुपारनंतर जिल्ह्यातील बीड, गेवराई, पाटोदा, आष्टी आणि केज तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. तर अनेक ठिकाणी गारपीट देखील झाली. परिणामी काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दुपारनंतर सुरू झालेला पाऊस हा मध्यरात्रीपर्यंत सुरू होता. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. या पावसाने उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांच्या पिकांचं मात्र मोठं नुकसान झालं आहे. आंबा, मोसंबी, डाळिंब या फळबागांसह इतर पिकांना अवकाळी पावसासह गारपिटीचा फटका बसला आहे. त्यामुळे याचे पंचनामे करून मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. 

हिंगोली वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा जमीन दोस्त 

काल हिंगोली जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वारे अवकाळी पाऊस यासह काही ठिकाणी गारपीट झाली आहे. याचा फटका मोठ्या प्रमाणात शेतातील केळीच्या बागांना बसला आहे. केळीच्या बागा वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाल्या आहेत. जिल्ह्यातील गिरगाव कुरुंदा दांडेगाव वडगाव या शिवारामध्ये वादळी वाऱ्याचा केळीच्या बागांना मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. तयार झालेले केळी सुद्धा मोडून पडल्या आहेत. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी मोठे संकटात सापडले आहेत.