Maharashtra Weather Update: राज्यात गारवा कमी होऊन उन्हाचा चटका तीव्र होत आहे . फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच तापमानाचा पारा चढाच असल्याची नोंद हवामान विभागाने केली असून बहुतांश ठिकाणी तापमानाने छत्तीशी गाठली आहे . मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तापमान 18- 22 अंश सेल्सिअस गेल्याची नोंद झाली . शुक्रवारी सोलापूर , साताऱ्यात किमान तापमान 23 अंश सेल्सिअस होते .नांदेड -लातूरमध्ये 21 अंश तापमानाची नोंद झाली .पुण्यात शुक्रवारी ( 7 फेब्रुवारी ) 18-20 अंश सेल्सिअस तापमान होते . (IMD Forecast)
राज्यात बहुतांश ठिकाणी किमान व कमाल तापमान वाढले असून मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात उष्णतेचा चांगलाच चटका जाणवू लागला आहे .बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा 35 अंशांच्या वर गेला होता .राज्यात कोरडे व शुष्क वारे वाहत असून आकाश निरभ्र राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय . (Temperature Update)
हवामान विभागाचा अंदाज काय ?
राज्यात मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि मराठवाड्यात तापमानाचा पारा सरासरीपेक्षा अधिक नोंदविला गेला .हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 3 ते 4 दिवस कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता असून येत्या 24 तासात ही वाढ होईल असा अंदाज आहे .प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार,येत्या 5 दिवसात राज्यात किमान व कमाल तापमान सामान्य तापमानाहून अधिकच असणार आहे.उत्तर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी येत्या 24 तासात हळूहळू तापमानात वाढ होईल.त्यामुळे नागरिकांना प्रचंड उकाडासह उष्णतेचा चटका जाणवणार आहे. (IMD Forecast)
शुक्रवारी राज्यात कुठे कसे तापमान होते ?
राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद पुण्यात (CME दापोडी) 43.4°C झाली, तर लोणावळ्यात 38.3°C, तळेगावमध्ये 37.6°C आणि शिवाजीनगर येथे 34.4°C कमाल तापमान राहिले. पुण्यात काही भागांत आर्द्रता 100% पर्यंत पोहोचल्याने उष्णतेचा प्रभाव अधिक जाणवला. मध्य महाराष्ट्रात सातारा (39.3°C), कराड (39.3°C) आणि सोलापूर (37.1°C) येथे उन्हाचा चटका वाढला, तर नाशिक (कळवण) येथे किमान तापमान 15.6°C राहिले. बईत कोलाबा (28.4°C) आणि सांताक्रूझ (34.0°C) येथे तुलनेने सौम्य तापमान राहिले असले, तरी आर्द्रता 92% पर्यंत गेल्याने उष्णता अधिक जाणवत होती. मराठवाड्यात लातूर (35.4°C), परभणी (34.8°C), नांदेड (34.0°C) आणि हिंगोली (34.9°C) येथे तापमान वाढले, तर लातूर आणि नांदेडमध्ये किमान तापमान 21°C पेक्षा जास्त राहिले. (Temperature Update)
हेही वाचा: