Maharashtra Weather : महाराष्ट्रातील (Maharashtra)वामानात सध्या सातत्यानं बदल (Climate change) होताना दिसत आहे. कुठे थंडीचा जोर आहे, तर कुठे ढगाळ वातवरण असल्याचे जाणवत आहे. मागील आठवडाभरापासून गायब झालेली थंडी पुन्हा एकदा परभणी जिल्ह्यात परतली आहे. 


परभणी जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला, तापमान 09.04 अंशावर
हवामान विभागाच्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असून जिल्ह्यातील तापमान 9.04 अंशावर गेले आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान 10 अंशाखाली गेल्याचे दिसून आले. त्यामुळे या जिल्ह्यात पुन्हा एकदा थंडी परतली असून सर्वत्र थंडीचा कडाका दिसून येत आहे.


 


परभणीकरांना भरली हुडहुडी


परभणी (parbhani) आणि धुळे (Dule) जिल्ह्यात तापामानाचा (Temperatures) पारा कमालीचा घसरला असून, थंडीचा कडाका (Cold Weather) वाढला आहे. परभणी जिल्ह्यात तापमानाचा पारा 9.4 अंशावर आला असल्यानं नागरिकांमध्ये हुडहुडी भरली आहे.


कडाक्याच्या थंडीने जिल्हा गारठला


कडाक्याच्या थंडीने जिल्हा गारठुन गेलेला आहे. नोंव्हेबर पासूनच जिल्ह्यात चांगलीच थंडी पडत आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पारा 10 अंशाच्या खाली आहे. शनिवारी निचांकी तापमानाची नोंद परभणीत झाली आहे. तर रविवारी देखील थंडीचा प्रभाव कायम राहीला आहे. शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटे थंडगार वारे जोरात वाहु लागल्याने गारठ्यात वाढ झाली आहे.


राज्यभरात वातावरणामध्ये लक्षणीय बदल 
सध्या राज्यभरात वातावरणामध्ये लक्षणीय बदल आहेत. गेल्या काही दिवसांपासून अचानकच ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पहाटेच्या वेळेला कडाक्याची थंडी तर सकाळी अकरानंतर सायंकाळी चार वाजेपर्यंत उन्हाचा उकाडा असं वातावरण आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालय आणि शासकीय रुग्णालयात ही सर्दी, ताप, दमा, खोकला या आजाराच्या रूग्णांनी भरून गेली आहेत. विशेषता बालरोगतज्ज्ञांकडे सध्या मोठी गर्दी दिसते आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय मध्ये वयोवृद्ध नागरिकांची गर्दी सुद्धा दिसतेय.


डिसेंबर महिन्यात थंडीचा जोर वाढणार


राज्यात कुठे ढगाळ वातावरण आहे तर कुठे थंडीचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. चालू डिसेंबर महिन्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसानंतर राज्यात थंडी वाढणार असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला.


इतर महत्वाच्या बातम्या


Gram Panchayat Election : राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीची आज निकाल; 'या' ठिकाणी बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम!