Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात बदल (Climate Change) होत आहे. अनेक भागात कडाक्याची थंडी (Cold Weather) पाहायला मिळत आहेत. तर काही भागात ढगाळ वातावरण होत आहे. दरम्यान, अशातच हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पंजाबराव डख यांनी नेमका काय अंदाज वर्तवलाय, त्याबाबतची माहिती पाहुयात.
शेतकऱ्यांनी 20 तारखेपर्यंत कांदा काढणी करुन घ्यावी
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 21 डिसेंबर ते 25 डिसेंबर पर्यंत भाग बदलत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळं शेतकऱ्यांनी 20 तारखेपर्यंत आपल्या शेतीची कामे पूर्ण करुन घ्यावीत असं आवाहान डख यांनी केलं आहे. ज्या शेतकऱ्यांची कांदा काढणी बाकी असेल त्यांनी 20 तारखेपर्यंत कांदा काढणी करुन घ्यावी असंही आवाहन त्यांनी केलं आहे.
कोणत्या भागात अवकाळी पावसाची शक्यता?
21 ते 26 डिसेंबर दरम्यान मुंबईसह पुणे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा सहित राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडणार आहे. भाग बदलत हा पाऊस पडणार आहे. 19 डिसेंबर पर्यंत राज्यात थंडीची लाट राहणार आहे. 20 तारखेनंतर वातावरणात बदल होईल. यानंतर 21 डिसेंबरला अवकाळी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे.
26 तारखेपर्यंत राज्यात अवकाळी राज्यात अवकाळी पावसाची शक्यता
21 तारखेला अवकाळी पाऊस सुरू झाला की 26 तारखेपर्यंत राज्यात अवकाळी पाऊस सुरू राहणार असल्याची माहिती पंजाबराव ढक यांनी दिली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची काळजी घ्यावी. एवढेच नाही तर 17 ते 19 डिसेंबर दरम्यान तिरुपतीकडे ही मुसळधार पावसाची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे.
अवकाळी पावसाच्या अंदाजामुळं शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. कारण, हा पाऊस फळ पिकांसाठी धोकादायक असतो. त्यामुळं द्राक्ष, डाळिंब केळी उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. मात्र, सध्या राज्यातील पावसाचं वातावरण निवळलं आहे. पुन्हा एकदा राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. मात्र, 21 डिसेंबरपासून राज्यात भाग बदलत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी नैसर्गिक संकटांचा मोठा फटका बसत असतो. या संकटामुळं अनेकवेळा हाती आलेली पिकं देखील वाया जाण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं शेतकरी धास्तावल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज