Maharashtra Weather : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'मंदोस' चक्रीवादळाचा (Mandos Cyclone) परिणाम काही राज्यांमध्ये दिसून येत आहे. या वादळानं चेन्नईच्या किनारपट्टीवर धडक दिली आहे. त्यामुळं तिथं जोराच्या वाऱ्यासह पाऊस (Rain) पडत आहे. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रावरही (Maharashtra) या चक्रीवादळाचा परिणाम झाला आहे. मंदोस चक्रीवादळामुळं महाराष्ट्रातही 11 ते 13 डिसेंबर दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (India Meteorological Department) देण्यात आला आहे.


Maharashtra Rain News : 11 ते 13 डिसेंबर राज्यात पावसाची शक्यता


मंदोस चक्रीवादळामुळं तामिळनाडू (Tamilnadu) आणि पुद्दुचेरीमध्ये (Puducherry) मध्यम ते जोरदार पावसाचा (Rain) अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे. हवामान विभागानं तामिळनाडू राज्यातील अनेक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या चक्रीवादळाच्या स्थितीमुळं महाराष्ट्रातही काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. त्यामुळं काही ठिकाणी थंडीचा जोर कमी झाला आहे.  11 ते 13 डिसेंबर यादरम्यान राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


Cold Weather : विदर्भात तापमानाचा पारा घसरला


वातावरणात सातत्यानं बदल (climate change) होत आहे. महाराष्ट्रात कुठे थंडीचा
कडाका (Cold Weather) जाणवत आहे तर कुठे ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मंदोस चक्रीवादळाचा देखील राज्यात परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान विदर्भात तापमानाचा (Temperatures) पारा चांगलाच घसरला आहे. गोंदिया जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरल्यानं हुडहुडी वाढली आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील परभणी (parbhani) आणि उत्तर महाराष्ट्रातील धुळे (Dule) जिल्ह्यातही थंडी वाढली आहे.


परभणीत गारठा वाढला, ठिकठिकाणी पेटल्या शेकोट्या 


मागील आठवड्यापासून गायब झालेली थंडी पुन्हा एकदा परतली आहे. परभणी जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. यंदाच्या मोसमातीलल सर्वात निचांकी तापमानाची नोंद परभणीत आज झाली आहे. तापमानाचा पारा 6.3 अंश सेल्सिअस एवढा घसरला आहे. त्यामुळं सर्वत्र हुडहुडी भरली आहे. शहरासह जिल्हाभरात शेकोट्या पेटल्याचे चित्र दिसत आहे. शहरात ठिकठिकाणी शेकोटी पेटवून बसलेले तरुण, महिला, वृद्ध पाहायला मिळत आहेत. एकीककडं गारठा तर दुसरीकडे राज्यात ढगाळ वातावरण दिसत आहे. त्यामुळं वातावरण सातत्यानं बदलत असल्याचं चित्र दिसत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Cyclone News : चक्रीवादळ आज चेन्नईच्या किनारपट्टीवर धडकणार, तामिळनाडूत मुसळधार पावसाचा अंदाज, महाराष्ट्रात काय स्थिती?