Maharashtra Weather forecast : सध्या महाराष्ट्रतील (Maharashtra) काही शहरांमध्ये कड्याक्याची थंडी (winter) पडली आहे. अशातच आता हवामान खात्याने महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो. असा अंदाज वर्तवला आहे. 28 डिसेंबर रोजी औरंगाबाद, जालना,जळगाव,गोंधीया,भंडारा,वर्धा,नागपूर, अमरावती,अकोला जिल्ह्यांत या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, तर 27 डिसेंबर रोजी विदर्भाच तुरळक प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. याबाबत IMD कडून हवामानाचे ताजे अपडेट जाहीर करण्यात आले आहेत. 


महाराष्ट्रात या ठिकाणी कडाक्याची ची थंडी
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही शहरांचा पारा घसरलेला आहे.
24 डिसेंबरचे राज्यातले किमान तापमान पुढील प्रमाणे-
नांदेड 13.8, जालना 13.3, सोलापूर-13
परभणी-13.5,कुलाबा- 20 , सांताक्रूझ-18.4,पुणे 12.4
कोल्हापूर- 16.6, रत्नागिरी-17.1
मालेगाव-13.2, ठाणे-20.2
नाशिक 12, बारामती 13.3


माथेरान 16.6, सांगली 15.2


देशभरात हुडहुडी, थंडीचा कडाका वाढला


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडील भागांत बर्फवृष्टीमुळे लेह-लडाख यांसारख्या जागांवर पारा उणे अंशांवर पोहोचला आहे. त्यासोबतच दिल्ली, राजस्थान, पंजाब, ओदिशा या राज्यांतही थंडी वाढल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये येत्या काही दिवसांत वाढत्या थंडीपासून दिलासा मिळू शकतो. IMD ने म्हटलंय की, 5 जानेवारी 2022 पर्यंत भारतातील बहुतांश भागात थंडीची लाट राहणार नाही. पण आज म्हणजेच, 24 नोव्हेंबर रोजी देशाच्या विविध भागात थंडीची लाट येऊ शकते. IMD ने आपल्या एका अंदाजात म्हटले आहे की, 27 ते 30 डिसेंबर दरम्यान, सक्रिय पश्चिमी विक्षोभामुळे बिहारच्या अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha