Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी थंडीमुळं हुडहुडी भरत असल्याचं चित्र दिसत आहे. मुंबईसह कोकण आणि विदर्भ वगळता महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, उत्तर सातारा तसेच छत्रपती संभाजीनगर, जालन्यात थंडी जाणवणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrav Khule) यांनी दिली. या 11 जिल्ह्यात सध्या 19 ते 23 जानेवारी पर्यंत पुढील 5 दिवसात पहाटेचे किमान तापमान हे 10 ते 12 डिग्री से.ग्रेड तर दुपारचे कमाल तापमान 26 डिग्री से. ग्रेड म्हणजे ही दोन्हीही तापमान सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने कमी दरम्यानचे असू शकते.
दक्षिण कोकणात कमाल तापमान वाढ
माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह कोकणात सध्या 19 ते 23 जानेवारी पर्यंत पुढील 5 दिवसात पहाटेचे किमान तापमान हे 14 डिग्री से.ग्रेड तर दुपारचे कमाल तापमान 26 डिग्री से. ग्रेड म्हणजे ही दोन्हीही तापमाने सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने कमी दरम्यानचे असु शकतात. दक्षिण कोकणात कमाल तापमान वाढ ही एखाद्या डिग्रीने अधिक असेल अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली.
विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात सध्या 19 ते 23 जानेवारी पर्यन्तच्या पुढील 5 दिवसात पहाटेचे किमान तापमान हे 14 ते 16 डिग्री से.ग्रेड तर दुपारचे कमाल तापमान 28 डिग्री से. ग्रेड म्हणजे ही दोन्हीही तापमाने सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने अधिक दरम्यानचे असु शकतात. विदर्भात 23 जानेवारीनंतर 3 दिवसासाठी म्हणजे 25 जानेवारी पर्यंत ढगाळ वातावरण राहून थंडी काहीशी कमी होईल. अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते, अन्यथा नाही.
पावसाची कोणतीही शक्यता नाही
सध्या महाराष्ट्रात पावसाची कोणतीही शक्यता नसून रब्बी हंगामातील भरड धान्य शेतपिके आणि इतर भाजीपाला पिके पाण्यावर आली असतील तर सिंचन करण्यास हरकत नसल्याचे माणिकराव खुळे म्हणाले. या कालावधीत ही रब्बी पिके फलधारणेच्या म्हणजे दाणाभरण्याच्या अवस्थेत तर काही हुरडा अवस्थेत आहेत. म्हणून तर या कालावधीत पीकांच्या मुळांना वाढीसाठी जमिनीखाली मोकळी हवा आणि जमिनीच्या वर पिकांना निरभ्र आकाशातून प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेतून अन्नद्रव्यासाठी मकर संक्रांतीदरम्यान स्वच्छ सूर्यप्रकाश हवा असतो. म्हणून इतर प्रणालीतून वातावरणीय अडथळ्याविना नेहमी असतो तसा स्वच्छ थंडीचा काळ शेतीसाठी महत्वाचा मानला जातो. तो सूर्यप्रकाश सध्या मिळतो आहे.
महत्त्वाच्या बातम्या: