Washim News : "आम्ही दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतो, आम्हाला लग्न करायचे आहे" असे सांगत एक जोडपं चक्क वाशिमच्या (Washim) शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये आलं. प्रेमी युगुलांची (Wedding In Police Station) भावना लक्षात घेता पोलिसांनी (Washim Police) देखील दोघांचा चक्क पोलीस ठाण्यातच विवाह लावला. काय घडलं नेमकं?


घरच्या मंडळीला लग्न मान्य नव्हतं


घरून पळून गेलेल्या एका प्रेमी युगुलाचा विवाह वाशिमच्या शिरपूर पोलीस स्टेशन परिसरात पार पडला. शिरपूर गावातील एका 21 वर्षीय तरुणीच गावातील एका 23 वर्षीय युवकासोबत प्रेम जडले. प्रेमाच्या आणाभाका घेत दोघे घरातून लग्न करण्यासाठी बाहेर पडले. मात्र घरच्या मंडळीला हे लग्न मान्य नसल्याने या प्रेमी युगुलाने पोलीस स्टेशन गाठत पोलिसांच्या साक्षीने लग्न केलं. कुटुंबियांकडून नववधूला त्रास देणार नाही, अशी हमी पोलिसांकडून दिल्यानंतर नवदाम्पत्य वर-वधू आनंदाने घरी गेले


पोलिसांनी प्रेमीयुगुलाची ऐकली व्यथा


आम्ही दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतो, आम्हाला लग्न करायचे आहे, परंतु कुटुंबियाकडून विरोध होत असल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. आम्ही दोघेही सज्ञान आहोत, असे त्यांनी शिरपूरच्या पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी यांनी ही व्यथा ऐकून दोघांचा विवाह लावून देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वेळातच या प्रेमीयुगुलाचा विवाह पोलिस ठाण्यात पार पडला. या विवाहाला दोन्हीकडचे कुटुंबीय उपस्थित होते. त्यानंतर दोघांनी सर्वांचे आशीर्वाद घेतले.


दोघेही सज्ञान असल्याने घरून पळून गेले


यापूर्वीही अशी घटना घडल्या होत्या, कुटुंबियांकडून परवानगी मिळत नाही म्हणून अनेक प्रेमीयुगूल पोलीस स्टेशनचा आधार घेतात. त्यापैकीच एक घटना अकोल्यात घडली होती, पळून जाऊन लग्न केलेले प्रेमी युगुल स्वसंरक्षणासाठी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी युवती आणि युवकाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. अशावेळी त्यांना धीर देणे अपेक्षित होते; मात्र पोलिसांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. खामगाव येथील एक युवती अकोल्यातील चिखलपुरा येथील एका युवकाच्या प्रेमात पडली. दोघेही आंतरजातीय असल्याने युवतीच्या कुटुंबीयांकडून विरोध असणे स्वाभाविक होते. दोघेही सज्ञान असल्याने ते घरून पळून गेले, त्यानंतर लग्न करून ते सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात पोहचले. मात्र, युवती हरवल्याची तक्रार खामगाव पोलीस ठाण्यात असल्याने सिव्हिल लाइन्स पोलिसांनी हात वर केले आणि खामगाव पोलिसांना कळवले. तसेच घटनेची माहिती युवतीच्या पालकांनाही देण्यात आली. त्यानुसार तेही सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात धडकले होते