आघाडीतला जागा वाटपाचा घोळ मिटणार? मित्रपक्षांना 38 जागा, शेकाप-स्वाभिमानीला प्रत्येकी 10
एबीपी माझा वेब टीम | 02 Oct 2019 05:42 PM (IST)
महाआघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटण्याची चिन्हं आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीकडून मित्रपक्षांना 38 जागा मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे.
मुंबई : महाआघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटण्याची चिन्हं आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीकडून मित्रपक्षांना 38 जागा मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे. शेतकरी कामगार पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला प्रत्येकी 10 जागा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष आघाडीसोबत निवडणूक लढणार आहे. प्रहार संघटनेला आघाडीत 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. अचलपूर आणि मुंबईतील एका जागेवर प्रहारचा उमेदवार निवडणूक लढेल. विशेष म्हणजे समाजवादी पक्ष आघाडीमधून बाहेर पडण्याच्या चर्चा रंगत असतानाच सपाला तीन जागा दिल्या जाणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी शिरोळमधून लढण्याची शक्यता आहे. शेकाप आणि डाव्या आघाडीच्या लोकांनी राजू शेट्टी यांना शिरोळमधून लढण्याची विनंती केली आहे. राजू शेट्टी यांनी शिरोळमधून निवडणूक लढण्यास तयारी दाखवली, तर त्यांच्या सामना त्यांचेच एकेकाळचे सहकारी आणि सध्याचे शिवसेना आमदार उल्हास पाटील यांच्याविरोधात होण्याची शक्यता आहे. मंदिराच्या नावाखाली सर्वकाही उध्वस्त करण्याचं काम सुरु, पवारांचा घणाघात | पुणे | एबीपी माझा