मुंबई : भारतीय जनता पक्षाची विधानसभा उमेदवारांची दुसरी यादी अद्याप जाहीर झालेली नाही. सर्वांना या यादीची प्रतीक्षा आहे. काही मतदारसंघांच्या उमेदवारीमुळे ही यादी रखडल्याची माहिती मिळाली आहे.


स्थानिक पातळीवरील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुलाबा विधानसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची? यासंदर्भात मुंबईत भाजप कोअर कमिटी आणि महाराष्ट्र प्रभारी यांच्यात आज एक बैठक पार पडली. या बैठकीला कुलाब्याचे विद्यमान आमदार राज पुरोहितही उपस्थित होते.

कुलाबा मतदारसंघातून राहुल नार्वेकर म्हणजेच विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर यांचे जावई यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावर विद्यमान आमदारांनी विरोध दर्शवला व गोंधळ केल्याचे समजते. महाराष्ट्राचे प्रभारी केशव प्रसाद मौर्य यांना आपल्या बाजूनं वळवण्याचा पुरोहित यांचा प्रयत्न असून त्यामुळे मंगलप्रभात लोढा विरुद्ध राज पुरोहित असा सामना रंगल्याचे सध्याचे चित्र आहे.

कुलाब्यात अणुलोम व आरएसएस यांनी सर्व्हे केला. त्यानुसार भाजप कुलाब्यातून तरुण चेहरा देण्याच्या विचारात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य राहुल नार्वेकर यांना फोडून भाजपच्या कमळावर लढवण्यावर भाजपात एकमत झाले आहे. तसेच भाजप प्रदेश सरचिटणीस अमोल जाधव यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. राज पुरोहित यांचा पत्ता कट झाला तर या दोघांपैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

पाच शहरांमधील जागावाटपात शिवसेनेला स्थान नाही | ABP Majha



भाजप पदाधिकाऱ्यांचं सामूहिक 'राजीनामास्त्र' | ABP Majha