मुंबई : विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Session)पहिल्याच दिवशी सभागृहात जोरदार राडा पाहायला मिळाला. अधिवेशनात तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की प्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना (BJP MLA suspended) निलंबित करण्यात आलं आहे. गैरवर्तन करणाऱ्या आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. अभिमन्यू पवार, आशिष शेलार, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, राम सातपुते, गिरीश महाजन, संजय कुटे, नारायण कुचे, पराग आळवणी, हरिश पिंपळे, नारायण कुचे, कीर्तिकुमार भांगडिया यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
Maharashtra Assembly Session 2021 : तालिका अध्यक्ष धक्काबुक्की प्रकरणी भाजपचे 12 आमदार निलंबित
त्या एका तासात विधानसभेत काय घडलं?
भाजपच्या 12 आमदारांवरच्या निलंबनाच्या कारवाईची ‘टाईमलाईन’
• ओबीसी आरक्षणसाठी केंद्रानं ओबीसींचा इम्पेरिकल डेटा तात्काळ उपलब्ध करुन द्यावा, यासाठी राज्य सरकारने विधान सभेत ठराव मांडला.. याबाबत मंत्री छगन भुजबळांकडून विधानसभेत ठराव पटलावर
• या ठरावात भाजप सरकारच्या काळात आणलेला अध्यादेश ,कोर्टाचे आदेश आणि केंद्राकडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना इंपेरिकल डाटा मागवण्यात आला ,पत्र लिहिले गेले ही माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली
• मंत्री छगन भुजबळांनी ओबीसी आरक्षणाचा ठराव मांडताना अर्धसत्य सांगितलं; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
• या ठरावानं ओबीसींना आरक्षण मिळणार नाही; फडणवीसांचा राज्य सरकारवर निशाणा
• या इंपेरिकल डाटामध्ये चुका आहेत म्हणून दिला नाही फडणवीस यांनी केलं स्पष्ट
• यावर उत्तर देताना तुम्ही सत्तेत असताना काय केलं? केंद्र सरकारने तयार केलेल्या जर या डेटा मध्ये चुका आहेत तर त्या दुरुस्त का नाही केल्या भुजबळ यांचा फडणवीस यांना सवाल
• अखेरीस विधानसभा अध्यक्षांनी हा ठराव मंजूर करण्यासाठी मतदानाला टाकला..पण भुजबळांनी केलेल्या आरोपावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना बोलू न दिल्याने भाजप आमदार आक्रमक
• गिरीश महाजन तालिका अध्यक्षच्या खुर्चीसमोर आक्रमक होऊन बोलत होते
• ठराव मंजूर होत असताना संजय कुटे,रावल यांनी तालिका अध्यक्ष यांचा माईक खेचला
• एक आमदाराने राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला
• आमदार आशिष शेलारमध्ये पडले. त्यांनी या आक्रमक आमदारांना हात धरून बाजूला केलं, थांबवलं..
• या गोंधळात ओबीसी आरक्षण साठी केंद्रानं इम्पेरिकल डेटा देण्यासाठीचा ठराव मंजूर
• ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारविरोधात ठराव आवाजी मतदानानं मंजूर; पण झालेल्या गोंधळामुळे विधानसभेचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब
• विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना बोलायला न दिल्यामुळे विरोधी पक्षाचे आमदार विधान सभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या दालनात.. दालनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव उपस्थित..भास्कर जाधव यांनी तिथे दालनात आपल्याला धक्काबुक्की केल्याचे म्हटलं
• इतकंच नाहीतर काही आमदारांनी आई बहिणी वरून शिव्या घातल्याची माहिती सभागृहाला दिली
• सभागृहात विधानसभा अध्यक्षांच्या दालनात धक्काबुकी झाली पण तेव्हा दिलगिरी व्यक्त करण्यात आल्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट
• सभागृहात जे घडलं ते महाराष्ट्राच्या परंपरेला काळिमा फासणारे, तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांचं सभागृहात निवेदन
• तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की प्रकरणी अखेरीस संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजपच्या 12 आमदारांवर एक वर्ष निलंबनाची कारवाई
• विधानसभेतून विरोधकांचा सभात्याग