Maharashtra Cabinet expansion : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पाच ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी भाजपचे 8 तर शिंदे गटामधील सात जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. राजभवनामध्ये या अनुशंगाने तयारी सुरु करण्यात आली आहे. भाजपकडे स्वतःचे आणि अपक्ष असे 115 आमदार आहेत. शिंदे यांच्याकडे शिवसेना आणि अपक्ष असे 50 आमदार आहेत. शिंदेंसोबत आलेल्या मोठ्या नेत्यांना मंत्री करावेच लागेल. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळ विस्तार करताना एकनाथ शिंदेंना प्रादेशिक समतोल बघावा लागेल.

  


शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी राजभवानावर  मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपकडून आठ तर शिंदे गटाकडून सात जण शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून नव्या सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत. सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातच मंत्रिमंडळ विस्तार होणे अपेक्षित होतं परंतु चार आठवडे झाले तरी विस्तार होत नाही त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात नेमकी अडचण काय? असा प्रश्न उपस्थित झालाय. 


मिळालेल्या माहितीनुसार, सहा तारखेला राज्यपालांचा नियोजित दिल्ली दौरा आहे. तर सात तारखेला निती आयोगाची बैठक आहे, त्यामध्ये सहभागी होण्यासाठी एकनाथ शिंदे यांना दिल्लीला जायचं आहे. त्यामुळे त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. बुधवारी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यावतीनेही मंत्रिमंडळ विस्ताराबाबत संकेत देण्यात आले आहेत. रविवारच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे केसरकर यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यामुळे लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गृहमंत्री आणि अर्थमंत्री पद भाजपकडे राहणार असल्याची माहिती. तसेच नगरविसाकर मंत्रिपद शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. 


भाजपकडून कुणाला संधी मिळू शकते?


चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)


सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)




 



गिरीश महाजन (Girish Mahajan)


राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe)


आशिष शेलार (ashish Shelar)


प्रवीण दरेकर (Pravin Darekar)


चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)



तर शिंदे गटाकडून


गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)


उदय सामंत (uday Samat)


दादा भुसे (Dada Bhuse)


शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)


अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना संधी मिळू शकते